ड्रेनेज चेंबरमध्ये दीडवर्षीय चिमुकला पडला अन्....
By Admin | Updated: September 28, 2016 00:49 IST2016-09-28T00:19:57+5:302016-09-28T00:49:29+5:30
औरंगाबाद : फाजलपुरा भागात महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी ३० ते ४० वर्षांपूर्वी ३५० घरांची वसाहत उभारण्यात आली आहे. या वसाहतीमध्ये मागील

ड्रेनेज चेंबरमध्ये दीडवर्षीय चिमुकला पडला अन्....
औरंगाबाद : फाजलपुरा भागात महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी ३० ते ४० वर्षांपूर्वी ३५० घरांची वसाहत उभारण्यात आली आहे. या वसाहतीमध्ये मागील काही दिवसांपासून तुंबलेले ड्रेनेज लाईन उघडेच होते. मंगळवारी सकाळी कार्तिक सुधीर साठे हा दीडवर्षीय चिमुकला ड्रेनेजच्या चेंबरमध्ये पडला. त्याला त्वरित बाहेर काढण्यात आले. मात्र, बेशुद्धावस्थेत कार्तिकला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे.
मनपाचे कर्मचारी सुधीर साठे यांच्या घरासमोरील ड्रेनेज लाईन मागील १५ दिवसांपासून तुंबली आहे. अनेकदा वॉर्ड कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साफसफाईसाठी टेंडर होणार आहे. चोकअप काढण्यासाठी निधी नाही, आदी कारणे सांगितली. ड्रेनेजचे पाणी घरांमध्ये शिरत असल्याने तुंबलेल्या चेंबरचे झाकण कोणीतरी उघडले. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता साठे यांचा दीडवर्षीय मुलगा कार्तिक घरासमोर खेळत ओता. अचानक कार्तिक ड्रेनेजच्या तुंबलेल्या चेंबरमध्ये पडला. काही सेकंदात आसपासच्या नागरिकांनी त्याला बाहेर काढले. तोपर्यंत कार्तिकच्या नाका-तोंडात घाण पाणी गेले होते. त्याला लगेचच बेशुद्धावस्थेत खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.