हुंड्याची ‘डिमांड’ बढतीवर

By Admin | Updated: May 16, 2014 00:16 IST2014-05-15T23:32:29+5:302014-05-16T00:16:56+5:30

प्रदीपकुमार कांबळे, लोहा हुंडा घेणे आणि देणे कायद्याने गुन्हा आहे. तरीसुध्दा वराकडील मंडळी वधूपित्याकडून सर्रास हुंड्याची मागणी करीत आहेत.

Dowry demand increases | हुंड्याची ‘डिमांड’ बढतीवर

हुंड्याची ‘डिमांड’ बढतीवर

प्रदीपकुमार कांबळे, लोहा हुंडा घेणे आणि देणे कायद्याने गुन्हा आहे. तरीसुध्दा वराकडील मंडळी वधूपित्याकडून सर्रास हुंड्याची मागणी करीत आहेत. मुलगी सुखात राहील, या आशेने कर्जबाजारी होऊन लाखो रुपयांच्या मागणीला वधुपित्याकडून होकार दिला जातो. विशेष म्हणजे अनेक जण हुंड्याच्या रुपात सोन्याची मागणी करीत आहेत. यामुळे हुंडा प्रतिबंधक कायदा कागदावरच असल्याचे दिसून येते. सज्ञान होताच पालकांना मुला- मुलींच्या लग्नाचे वेध लागतात. त्यात मुलगा उच्चशिक्षीत वा चांगल्या नोकरीवर असल्यास सोन्याहून पिवळे, असे म्हटले जाते. यानंतर वाटेत ते करुन मुलीचे लग्न त्या घरात लावून दिले जाते. या प्रकारामुळेच हुंडाप्रथा अद्याप बंद झाली नाही. मुलीकडील मंडळी देत आहेत तर आम्ही का घेऊ नये? अशी धारणा कुंटुंबातील लोकांची झाली आहे. हुंडा देण्याची प्रथा म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे. पूर्वी राजे, महाराजे आपल्या मुलींना त्रास होवून नये म्हणून हुंड्यात सेवक देत होते. पण ही पद्धत आता बदलत चालली आहे. वर पक्षाकडून लग्न, वरात, तसेच वराच्या शिक्षण ते नोकरीपर्यंतचा आलेला खर्च वधू पक्षाकडून हुंड्याच्या रुपात वसूल करण्याची प्रथा जोडून पैसा कमविण्याचा मार्ग बनविण्यात आला आहे. मुलीला चांगल्या स्वभावाचा श्रीमंत नोकरी असलेला मुलगा मिळावा, यासाठी वधू पिता प्रयत्नाची पराकाष्ठा करताना दिसतो, हुंड्याशिवाय सुयोग्य मुलगा सापडणे कठीण जाईल, असा विचार मुलीच्या कुंटुबियांना भेडसावताना दिसतो. शासनाने समाजात वाढलेल्या कुप्रथेला बंद करण्याच्या उद्देशाने हुंडा प्रतिबंक कायदा आणला, मात्र कुणीही हुंडाविरोधी कायद्याच्या अनुषंगाने तक्रार करीत नाही, हे सत्य नाकारता येत नाही. एकीकडे हुंडा घेऊ नये, यासाठी समाजात जागूती करण्यात येत असली तरीही त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसते. हुंडा समाजाला लागलेला कलंक मुलगी सुखात राहील, या आशेने वधू पिता कर्जबाजारी होवून लाखो रुपयांच्या मागणी करतात मान्य मुलीकडील मंडळी देत आहेत तर आम्ही का घेऊ नये? अशी धारणा वर पक्षाची होतयं

Web Title: Dowry demand increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.