बस सोडण्याच्या मागणीसाठी मुलींचे धरणे आंदोलन
By Admin | Updated: July 7, 2017 17:51 IST2017-07-07T17:44:47+5:302017-07-07T17:51:21+5:30
मानव विकास अंतर्गत बस सुरू करा या मागणीसाठी मानवत बसस्थानकात शालेय मुलींनी दुपारी बस रोखुन धरत धरणे आंदोलन केले.

बस सोडण्याच्या मागणीसाठी मुलींचे धरणे आंदोलन
>ऑनलाइन लोकमत
परभणी : मानव विकास अंतर्गत बस सुरू करा या मागणीसाठी मानवत बसस्थानकात शालेय मुलींनी दुपारी बस रोखुन धरत धरणे आंदोलन केले.
मानवत- पळोदी या मार्गावरील रस्त्याच काम पूर्ण होऊन सुद्धा मानव विकास अंतर्गत असलेली बस शाळासुरू झाल्या तरी सुरु झाली नाही. यामुळे या मार्गावरील आंबेगाव, हत्तलवाडी, बोण्डरवाडी, सावळी, खडकवाडी, पिंपळा, पळोदी, जंगमवाडी या गावातील मुलींना शहरातील शाळेत जाण्यासाठी अडचणीला सामोरे जावे लागत आहे. वेळोवेळी मागणी करूनही बस सुरु होत नसल्याने शेवटी मुलींनी बसस्थानकात धरणे देत बस रोखून धरल्या. मानव विकास अंतर्गत असलेली बस सुरु करण्याच्या मुलींच्या या आंदोलनात नंतर काही पालक व विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला.
सोमवारी बस सोडण्याचे आश्वासन पाथरी येथील आगर प्रमुख यांच्या कडून विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात आल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले