कपातीच्या निर्णयामुळे धास्ती
By Admin | Updated: December 11, 2014 00:24 IST2014-12-11T00:20:59+5:302014-12-11T00:24:04+5:30
हिंगोली : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर विकासाचा वेगळा ट्रेेंड निर्माण होण्याची स्वप्ने पाहिली गेली. मात्र जुन्या सरकारवर खापर फोडून निधी कपातीची घोषणा करण्यात आली आहे.

कपातीच्या निर्णयामुळे धास्ती
हिंगोली : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर विकासाचा वेगळा ट्रेेंड निर्माण होण्याची स्वप्ने पाहिली गेली. मात्र जुन्या सरकारवर खापर फोडून निधी कपातीची घोषणा करण्यात आली आहे. पुरवणी अर्थसंकल्पीय तरतुदीत मात्र काही प्रमाणात निधी मिळाल्याचे केवळ समाधान आहे.
जिल्हा वार्षिक योजनेत जवळपास ८0 कोटी मंजूर आहेत. त्यापैकी ४८ कोेटी मिळाले आहेत. उर्वरित निधी हा चाळीस टक्केच राहिला आहे. त्यामुळे शासनाकडून लावण्यात येणारी कात्री याच निधीला बसते की काय, अशी धास्ती निर्माण झाली आहे. काही योजनांत अधिकचे नियोजन करून पुढच्या वर्षीचा निधी त्याच कामासाठी वापरता येईल, अशा पद्धतीने नियोजन केले जाते. मात्र ही बाब यावर्षी अंगलट येण्याचीच चिन्हे आहेत. अशा पद्धतीने नियोजन केले अन् यंदाचाच पूर्ण निधी मिळाला नाही तर पुढील वर्षीच्या नियोजनाचे तीनतेरा वाजणार आहेत.
विविध विभागांनी वार्षिक योजनेतील निधी खर्चासाठी आता हालचाली गतिमान केल्या आहेत. यापूर्वी सलग दोन निवडणुकांमुळे कोणत्याही विभागाला कामे करता आली नाहीत. एकतर आचारसंहितेने बरीच कामे खोळंबली होती. त्यानंतर इतर कामे अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या कामात जुंपली गेल्याने रखडली होती. याचा परिणाम जिल्ह्यात दिसून आला. अनेक कामे आता सुरू होत आहेत. विविध प्रकारच्या कामांच्या निविदापासून ते कामे सुरू होण्यापर्यंतचा काळ सध्या आहे. मात्र मध्येच निधी कपातीची महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची घोषणा सर्वांनाच बुचकळ्यात टाकून गेली. यात नेमकी कोणती कपात होणार यावरून सं:दिग्धता दिसून येते. लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांतही याबाबतची चर्चा होत आहे.(वार्ताहर)