करणीच्या संशयावरून दाम्पत्यावर हल्ला

By Admin | Updated: April 25, 2016 00:37 IST2016-04-25T00:02:11+5:302016-04-25T00:37:06+5:30

कसबे तडवळे : करणी भानामती करुन आईस मारल्याचा संशय घेऊन तरुणाने सख्ख्या चुलता व चुलतीवर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील खामगाव येथे शनिवारी रात्री घडली.

Doubt attack on suspicion of duty | करणीच्या संशयावरून दाम्पत्यावर हल्ला

करणीच्या संशयावरून दाम्पत्यावर हल्ला


कसबे तडवळे : करणी भानामती करुन आईस मारल्याचा संशय घेऊन तरुणाने सख्ख्या चुलता व चुलतीवर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील खामगाव येथे शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खामगाव येथील किशोर हनुमंत गुरव (वय २४) याची आई सुनंदा हनुमंत गुरव यांचा सहा महिन्यांपूर्वी आजारपणात मृत्यू झाला. परंतु, आपल्या आईचा मृत्यू हा चुलते बळीराम गुरव व चुलती मिराबाई गुरव यांनी करणी भानामती केल्यामुळे झाल्याचा संशय किशोर गुरव याच्या मनात होता. शनिवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास बळीराम गुरव व मिरा गुरव हे दाम्पत्य शेतातून परत येत असताना गावाजवळच किशोर हा आचानक त्यांच्याजवळ आला व त्याने नवरा-बायकोवर कोयत्याने वार केले. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, मीराबाई यांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
या बाबत मिराबाई गुरव यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलिस ठाण्यात किशोर गुरव याच्याविरुध्द जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्यास ताब्यातही घेतले आहे. तपास फौजदार किशोर काळे हे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Doubt attack on suspicion of duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.