‘मास्क नही पेहना, तो आयेगी विपत्ती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:05 IST2021-04-22T04:05:11+5:302021-04-22T04:05:11+5:30
औरंगाबाद : ‘महावीर ने सिखाया अहिंसा वाणी, मुॅंह पर मास्क नही पेहना तो आयेगी विपत्त्ती...’, ‘घरी बसून बोअर झालो, ...

‘मास्क नही पेहना, तो आयेगी विपत्ती’
औरंगाबाद : ‘महावीर ने सिखाया अहिंसा वाणी, मुॅंह पर मास्क नही पेहना तो आयेगी विपत्त्ती...’, ‘घरी बसून बोअर झालो, लवकरात लवकर कोरोना गो...’ अशा काव्यातून वास्तव सांगणाऱ्या कविता उत्साहात सादर झाल्या आणि रसिकांची दाद मिळवणाऱ्या ठरल्या.
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त महिला समितीतर्फे आयोजित ऑनलाईन कोविड - १९ काव्यवाचन स्पर्धेला बालगाेपाळांसह सर्वच वयोगटातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रियंका सेठिया यांनी मंगलाचरण सादर केले आणि कार्यक्रमाची सुरूवात झाली.
नेहा लोहाडे, श्रद्धा मुथा, ऋतिका सावजी यांच्यासह अनेक मुलांनी उल्लेखनीय कविता सादर केल्या. विद्या मेहेत्रे व जयश्री हुडकर यांनी परीक्षण केले. मुक्ता दुग्गड यांनी सूत्रसंचालन केले तर छाया नहार यांनी आभार मानले. अनिलकुमार संचेती, नीलेश सावलकर, रवी मुगदिया, राजेश मुुथा, विलास साहुजी, नीलेश पहाडे, भारती बागरेचा, भावना सेठिया, करूणा साहुजी, कविता अजमेरा, मंगला पारख, मीना पापडीवाल, मंजू पाटणी, पुष्पा बाफना, डिंपल पगारिया, संगीता संचेती, माया मुथा हे कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते.