शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
2
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
3
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
4
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
5
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
6
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
7
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
8
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
9
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
10
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
11
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
12
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
13
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
14
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
15
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
16
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
17
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
18
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
19
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
20
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा

'आमच्या बायकोचे ऐकू नकोस'; पिंपळ पौर्णिमेनिमित्त पत्नी पीडित पुरुषांची यमराजाला विनवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 14:43 IST

करोडी येथील पत्नी पीडित पुरुष आश्रमात पार पडलेल्या या कार्यक्रमात न्यायव्यवस्था, कायदे आणि सामाजिक मानसिकतेतील एकतर्फी दृष्टिकोन बदलण्याचा निर्धार करण्यात आला.

वाळूज महानगर : स्त्रीसाठी वटसावित्री, तर पुरुषांसाठी पिंपळ पौर्णिमा ही न्यायाच्या साकड्यासाठी असावी, हा सामाजिक संदेश देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पत्नी पीडित पुरुष आश्रम, करोडी येथे सोमवारी कावळ्याच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुरुषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली. सकाळी १० वाजता पिंपळाच्या साक्षीने सुरू झालेल्या या कार्यक्रमात, अन्याय पीडित पुरुषांनी आपल्या व्यथा मांडल्या.

करोडी येथील पत्नी पीडित पुरुष आश्रमात पार पडलेल्या या कार्यक्रमात न्यायव्यवस्था, कायदे आणि सामाजिक मानसिकतेतील एकतर्फी दृष्टिकोन बदलण्याचा निर्धार करण्यात आला. पिंपळ वृक्षाची पूजा करत, पुरुषांवर होणाऱ्या अन्यायांविरोधात आवाज उठवला. पुरुषांसाठी ‘पिंपळ पौर्णिमा’ ही न्यायाच्या साकड्यासाठी असावी, असा भाव कार्यक्रमातून व्यक्त झाला. यावेळी उपाध्यक्ष सुरेश फुलारे, सचिव चरणसिंग गुसिंगे, सोमनाथ मनाळ, एकनाथ राठोड, भाऊसाहेब साळुंके, प्रवीण कांबळे, श्रीराम तांगडे, संजय भांड, वैभव घोळवे, दिनेश दुधाट, उमेश दुधाट आदींची उपस्थिती होती. यावेळी पत्नी पीडित पुरुष आश्रमाने शासनासमोर ५ ठोस आणि लिंगनिरपेक्ष मागण्या मांडल्या.

शासनाकडून काय अपेक्षा?- राष्ट्रीय पुरुष आयोगाची तातडीने स्थापना करावी- खोट्या तक्रारींवर कठोर व लिंगनिरपेक्ष कारवाई आणि शिक्षेची तरतूद असावी- प्रत्येक जिल्ह्यात पुरुष तक्रार निवारण केंद्र सुरू करावे- पोलिस ठाण्यांमध्ये पुरुष दक्षता कक्ष तयार करणे    - कौटुंबिक वाद वर्षभरात निकाली काढण्यासाठी स्वतंत्र न्याय प्रक्रिया निर्माण करणे

एकाच जन्मात उद्ध्वस्त होतो पुरुषपुरुष हा केवळ एक वेतन आणणारा घटक नाही. तो एक मुलगा आहे, एक पती, एक वडील आहे. पण, दुर्दैवाने त्याच्या वेदनांकडे कुटुंब, समाज, कायदा आणि यंत्रणा डोळेझाक करतात.

११,००० पुरुष आश्रमाशी संलग्नअनेकदा खोट्या तक्रारी, मानसिक छळ, जबरदस्तीची पोटगी आणि सामाजिक टाळेबंदी यामुळे पुरुष पूर्णतः कोसळतो. सिस्टीम पुरुषांविरुद्ध आहे अशी वेदना अनेकांच्या बोलण्यातून उमटली. या आश्रमाशी आजपर्यंत ११,००० हून अधिक पीडित पुरुष जोडले गेले आहेत. एकतर्फी कायद्यांमुळे पुरुषाला स्पष्टीकरण देण्याची संधी मिळण्याआधीच ‘गुन्हेगार’ ठरविले जात आहे.

देव तरी ऐकेल का?कार्यक्रमाची सांगता देव तरी आमचे ऐकेल का? या भावना व्यक्त करत करण्यात आली. पिंपळ वृक्षासमोर लीन होऊन ‘सत्य आणि न्याया’च्या साकड्याने या कार्यक्रमाचा समारोप झाला. पुरुषांनाही संवेदना असतात हा संदेश यातून दिला गेला.

वटसावित्रीच्या आदल्या दिवशी पिंपळास साकडेउद्या वटसावित्री पौर्णिमा आहे. आमच्या बायका उद्या वटवृक्षाला ७ जन्मासाठी साकडे घालतील. मात्र, याच जन्मी आम्ही दररोज मृत्यू अनुभवत आहोत. अशा भांडकुदळ बायकांसोबत एक दिवसही जगणे असह्य आहे. म्हणून पिंपळाला साकडे घालतोय की, खोटारड्या बायकोसोबत संसार करण्यापेक्षा कायम मुंजा ठेव. पिंपळ पौर्णिमेचा हा उद्देश आहे.- ॲड. भारत फुलारे, अध्यक्ष, पत्नी पीडित पुरुष आश्रम

टॅग्स :Vat Purnimaवटपौर्णिमाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर