शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नादी लागू नका, आयकरची धाड टाकू;थकीत वीजबिलावरून भाजप आमदाराची अभियंत्याला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 17:50 IST

''तुम्हाला अक्कल पाहिजे ? माज चढला का ? एका मिनिटात घरी पाठवेल, अरे नालायकांनो झोपडपट्ट्या, दलित वस्तीत वीजचोरी होते तेथे जाऊन कारवाई करा''

औरंगाबाद : नोटीस न देता थकीत वीजबिलामुळे मीटर काढून नेल्याचा आरोप करत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी संताप व्यक्त करत सहाय्यक अभियंत्यास शिवीगाळ केल्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. शिवीगाळसोबतच आमदार लोणीकर यांनी अभियंत्यास आयकर विभागाची धाड टाकण्याची धमकी देखील दिली आहे. आकडे टाकणाऱ्यांची वीज तोड असे आव्हान करून आमच्यासोबत नीट राहायचे, एका मिनिटात सस्पेंड करून टाकेल, अशा धमक्या लोणीकर यांनी फोनवरून दिल्या आहेत.

औरंगाबादमधील सातारा परिसरात बबनराव लोणीकर यांचा एक बंगला आहे. येथे जाधव नावाच्या व्यक्तीच्या नावे वीज मीटर आहे. या ठिकाणचे दोन वर्षांपासूनचे ३ लाख रुपयांचे थकीत वीजबिल आहे. वसुलीसाठी लोणीकर यांच्या घराच्या अनेक चकरा मारल्या, मुलासोबत बोलणे झाले,तरीही बिल भरले नाही, असे  महावितरणचे सहाय्यक अभियंता फोनवरून लोणीकर यांना सांगतात. मात्र, नोटीस न देता वीज मीटर कसे काय काढून नेले याचा जाब विचारत आमदार लोणीकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवर शिवीगाळ केलेले क्लिपमधून ऐकण्यात येते. परंतु, अभियंता मीटर काढून नेले नाही असे वारंवार सांगतात. याउपरही आ. लोणीकर यांनी अभियंत्याला, ''तुम्हाला  अक्कल पाहिजे ? माज चढला का ? एका मिनिटात घरी पाठवेल, अरे नालायकांनो झोपडपट्ट्या, दलित वस्तीत वीजचोरी होते तेथे जाऊन कारवाई करा'', असे आव्हानही देतात. 

अभियंता यावर तुमचे मीटर काढून नेले नाही, मुलाला परवाच भेटलो असे सांगितलं. यावर आ. लोणीकर यांनी पुन्हा शिवीगाळ करत, मी ३० वर्ष आमदार आहे, नियमित बिल भरतो, कृषीपंपाचे, जालना, परतूरच्या घराचे बिल भरतो. नीट वागा, काचेची बांगडी आहात तुम्ही, आमच्या नादी लागू नका, आम्ही एक रुपया ठेवणारे माणस नाहीत. आयकरच्या धाडी टाकू,तुमची कुंडली आहे, घरी बसवू, नीट वागा, सस्पेंड करू शकतो, आमच्या नादी लागू नका असा इशाराही आ. लोणीकर यांनी अभियंत्याला दिल्याचे या ऑडीओ क्लिपमध्ये आहे. ही क्लिप सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे. भाजपच्या एका आमदाराने विजबिलावरून केलेला संताप, दिलेल्या धमकांची सध्या चर्चा सुरु आहे. तर नागरिक, शेतकरी यांच्यावर कारवाई करणारे महावितरण आता काय पाऊल उचलते याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आहे. 

तो मी नव्हेच, माझ्या विरुद्ध षडयंत्रवीज वितरण कंपनीच्या आडून माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले जात आहे. माझे कुठलेही मीटर वीज वितरण कंपनीने काढून नेलेले नाही. त्यामुळे मी फोन लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. 

टॅग्स :Babanrao Looneykarबबनराव लोणीकरmahavitaranमहावितरणBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद