शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अफवांवर विश्वास ठेवू नका; पोलिसांची सर्व घटकांवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 11:39 IST

शहरातील विविध हॉटेल आणि लॉजची  तपासणी केली जात आहे.

औरंगाबाद : अयोध्येतील त्या जागेसंबंधी खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून शनिवारी जाहीर होण्याच्या शक्यतेनंतर पोलिसांनी शहरातील बंदोबस्त वाढविला आहे. मिश्र समाज वसाहतींमधील हॉटेल रात्री ११ नंतर बंद करण्यावर भर दिल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, अयोध्येतील निकालाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी विविध धर्मगुरू, राजकीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन शहरात शांतता राखण्यासाठी आवाहन केले आहे. निकालाचे कोणतेही पडसाद शहरात पडून शांतता धोक्यात येणार नाही, याबाबत पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. ३ पोलीस उपायुक्त, ६ सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, असे २०० अधिकारी, ३ हजार ५०० कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत. याशिवाय राज्य राखीव दलाच्या पाच कंपन्या, गृहरक्षक दलाचे जवान शहर पोलिसांच्या मदतीला आहेत. पोलिसांनी गस्त वाढविली आहे. 

संवेदनशील वसाहतींमध्ये पॉइंटपोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी सांगितले की, शहरातील संवेदनशील आणि मिश्र समाज वसाहतीत पोलिसांनी फिक्स पॉइंट लावले आहेत. १९९२ च्या दंगलीतील आरोपी असलेले आणि आताही सक्रिय असलेल्या लोकांना नोटिसा बजावून गैरकृत्य केल्यास कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे  बजावण्यात आले आहे. शहरातील गर्दीचे ठिकाण, रेल्वेस्टेशन, बसस्थानक आदी ठिकाणची बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून सतत तपासणी केली जात आहे. शहरातील विविध हॉटेल आणि लॉजची  तपासणी केली जात आहे. 

बाहेरगावी जाण्याचे बेत रद्दया निकालाच्या पार्र्श्वभूमीवर बाहेरगावी जाण्याचा बेत नागरिकांनी रद्द केला, तसेच बाहेरगावी असलेल्या नागरिकांनी आपल्या घरी परतण्याचा निर्णय घेतल्याचे अनेकांनी ‘लोकमत’ला सांगितले.

अफवांवर विश्वास ठेवू नका -पोलीस आयुक्त धार्मिक आणि जातीय दरी निर्माण करणा-यांवर पोलिसांचे लक्ष असून, सोशल मीडियावरील विविध ग्रुप, फेसबुकवरही पोलिसांची नजर आहे. शिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले. सोशल मीडियावरून आक्षेपार्ह संदेश, व्हिडिओ व्हायरल करणाºयांवर भा.दं.वि. १८८ नुसार आणि सायबर अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबाद