राजूर गणपतीस ३ लाख ३७ हजार रुपयांची देणगी

By Admin | Updated: November 2, 2015 00:15 IST2015-11-02T00:05:55+5:302015-11-02T00:15:30+5:30

राजूर : शनिवारी झालेल्या संकष्टी चतुर्थी निमीत्त राजूरेश्वर संस्थानला गणेश भक्तांकडून ३ लाख ३७ हजार ४४८ रूपये देणगी मिळाल्याची माहीती

Donation of Rs.3.37 thousand to Rajur Ganpati | राजूर गणपतीस ३ लाख ३७ हजार रुपयांची देणगी

राजूर गणपतीस ३ लाख ३७ हजार रुपयांची देणगी


राजूर : शनिवारी झालेल्या संकष्टी चतुर्थी निमीत्त राजूरेश्वर संस्थानला गणेश भक्तांकडून ३ लाख ३७ हजार ४४८ रूपये देणगी मिळाल्याची माहीती गणपती संस्थानचे अध्यक्ष तथा भोकरदनचे तहसिलदार मुकेश कांबळे यांनी दिली.
देणगीचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे- वाहनकर देणगी १० हजार ८० रूपये, प्रवेश देणगी ५९ हजार ७०० रूपये, अभिषेक देणगी ४० हजार ९७ रूपये, बांधकाम देणगी ३६ हजार ५५ रूपये, सुबक मार्बल आसन देणगी १५ हजार ५३१ रूपये, श्री दानपेटी एक लाख ५१ हजार ७७० रूपये, बांधकाम दानपेटी २४ हजार २१५ रूपये असे एकूण ३ लाख ३७ हजार ४४८ रूपये प्राप्त झाले.
चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी देणगी पेट्या उघडल्या असता, वरील देणगी मिळाल्याचे समजले. यावेळी मंडळअधिकारी बी.डी.राठोड, सरपंच शिवाजी पुंगळे, भिकनराव पुंगळे, जगन्नाथराव थोटे, छगन हाळदे, भिमराव बारवकर, भारतआप्पा कोमटे, गणेशराव साबळे, देविदास साबळे, मन्मथआप्पा दारूवाले, मनोज साबळे, ज्ञानेश्वर साबळे, अशोक कापरे, कांता डवले, संजय टेपले,बाळा तांगडे यांच्यासह भाविक, संस्थान व तहसिलचे कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Donation of Rs.3.37 thousand to Rajur Ganpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.