शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई मराठा समाजाची नाही का? शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 20:08 IST

मराठी बांधवांनीच हुतात्म्य दिल्यामुळे मुंबई आज महाराष्ट्रात आहे.

छत्रपती संभाजीनगर: मुंबईत दाखल आंदोलक मराठा बांधवांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी मुंबईकर करीत आहेत. मुंबई मराठा समाजाची नाही का असा सवाल विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते तथा उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. मराठी बांधवांनीच हुतात्म्य दिल्यामुळे मुंबई आज महाराष्ट्रात आहे. आंदोलकांचा त्रास होत असेल तर मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर मुंबईकरांनी दबाव आणावा, असेही त्यांनी सांगितले.

उद्धवसेनेचे नेते दानवे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याची माहिती चार महिने आधीच सरकारला दिली होती. मात्र सरकारने खबरदारी घेणे आवश्यक होते. या आंदोलनामुळे मुंबईतील व्यवस्थेवर ताण पडला असू शकतो. मात्र यास सरकारच जबाबदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर पाण्याची बाटली फेकण्याच्या घटनेकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले की, आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी नेते जात असतात तेव्हा आंदोलकांनी सयंमाने व्यवस्थित वागावे ,असे आपले मत आहे. 

ओबीसी महासंघ एरव्ही झोपलेलामराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहिर करा,असे सत्ताधारी म्हणत असतात, याविषयी विचारले असता दानवे म्हणाले की, तुमच्याकडे बहुमत असताना चार, सहा खासदार , १०आमदार असलेल्या शरद पवार यांचे मत कशाला हवं असा सवाल त्यांनी केला. राज्यसरकार केवळ राज्यात द्वेष आणि अशांतता निर्माण करीत असल्याचा थेट आरोपही दानवे यांनी केला. जरांगे यांच्या आंदोलनविरोधात ओबीसी महासंघाची आज पुण्यात बैठक झाली याकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले की, जरांगे यांनी आंदोलन सुरू केले तरच यांना जाग येते. एरव्ही ते लोक झोपलेले असतात.

मराठा समाजाला न्याय द्यावामनोज जरांगे यांनी मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची केलेली मागणी योग्यच आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज कुणबीच आहे. सरकारने जरांगे यांची मागणी मान्य करून मराठा समाजाला न्याय द्यावा,असेही दानवे यांनी नमूद केले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAmbadas Danweyअंबादास दानवेMaratha Reservationमराठा आरक्षण