निबंधकांकडे कागदपत्रांची मागणी

By Admin | Updated: March 11, 2017 23:53 IST2017-03-11T23:52:24+5:302017-03-11T23:53:56+5:30

जालना : बहुचर्चित जालना पीपल्स को आॅपरेटिव्ह बँकेतील बनावट सोने तारण ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी ३९ व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Documents request for registrar | निबंधकांकडे कागदपत्रांची मागणी

निबंधकांकडे कागदपत्रांची मागणी

जालना : बहुचर्चित जालना पीपल्स को आॅपरेटिव्ह बँकेतील बनावट सोने तारण ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी ३९ व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील काही कागदपत्र हस्तगत करण्यात आली आहेत. उर्वरित कागदपत्रासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु मालमत्तेसंदर्भातील कागदपत्र मिळविण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे कागदपत्रांची मागणी केली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्याकडे आल्याने त्यांनी तातडीने बदनापूर येथील जेपीसी बँकेतील कागदपत्रांची पडताळणी केली. परंतु संबंधित प्रकरणांची कागदपत्रे येथे आढळून आली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या संबंधी जालन्यातील बँकेच्या मुख्य शाखेकडे पोलिसांनी पत्र देऊन कागदपत्रांची मागणी केल्याची माहिती आहे.या प्रकरणाचा तपास डीवायएसपी बारी यांच्याकडे देण्यात आला.
परंतु या प्रकरणातील तीन वर्षांच्या काळात संचालक मंडळ, शाखाधिकाऱ्यांची भूमिका याची पडताळणी करण्यात येत आहे. याबाबत शहरातील जेपीसीच्या मुख्य शाखेकडून काही कागदपत्र तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे बारी म्हणाले. यासंदर्भात तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी म्हणाले की, दि जालना पीपल्स कॉपरेटिव्ह बँकेच्या बदनापूर शाखेत शेतमजूर, हमालांच्या नावे बनावट खाते उघडून त्यांच्याच नावावर बनावट सोने तारण ठेवून १ कोटी ६२ लाखांचे कर्ज उचलण्यात आले आहे. या संदर्भात विविधअंगांनी तपास करून ठोस कारवाईसाठी योग्य दिशेने तपास सुरू असून, प्राथमिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Documents request for registrar