कागदपत्र एकीचे; नोकरीवर दुसरीच !

By Admin | Updated: September 2, 2014 01:51 IST2014-09-02T00:33:22+5:302014-09-02T01:51:37+5:30

भादा : औसा तालुक्यातील वरवडा येथील अंगणवाडीत काम करणाऱ्या मदतनीस महिलेचे शैक्षणिक कागदपत्र हे तिच्या बहिणीचे असून, गेल्या आठ वर्षांपासून ही महिला कार्यालयात कार्यरत असल्याची

Documents are the same; Another job! | कागदपत्र एकीचे; नोकरीवर दुसरीच !

कागदपत्र एकीचे; नोकरीवर दुसरीच !


भादा : औसा तालुक्यातील वरवडा येथील अंगणवाडीत काम करणाऱ्या मदतनीस महिलेचे शैक्षणिक कागदपत्र हे तिच्या बहिणीचे असून, गेल्या आठ वर्षांपासून ही महिला कार्यालयात कार्यरत असल्याची तक्रार गावातील हणमंत माडजे यांनी एकात्मिक बालविकास अधिकाऱ्याकडे केली आहे.
औसा तालुक्यातील वरवडा येथे मे २००६ मध्ये अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिसांची निवड करण्यात आली. यात ११ मे २००६ रोजी सुरेखा जगदाळे यांनी आपल्या कागदपत्रांसह अर्ज केला. त्यांनी शाळा सोडल्याचा दाखलाही जोडला आहे. परंतु, त्यांचा विवाह अनसुर्डा (ता. उस्मानाबाद) येथे झाला असून, त्याच गावात त्या राहत आहेत. त्यांची बहीण सरोजा यांनी बहिणीच्या नावे अर्ज करून स्वत:ची नियुक्ती बनावट कागदपत्राआधारे केली आहे. सुरेखा जगदाळे यांचे दप्तरी नाव आहे. परंतु, आठ वर्षांपासून सरोजा कदम या मदतनीस म्हणून काम पाहत असल्याचा आरोप हणमंत माडजे यांनी बालविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केला आहे. त्यामुळे गावात चर्चेस उधाण आले आहे. (वार्ताहर)
सुरेखा जगदाळे या अनसुर्डा इथे राहत असून, त्यांचा मतदान यादीत २६९ असा क्रमांक आहे.
४यापूर्वी तक्रार आली असती तर आम्ही चौकशी केली असती. आता तक्रार दाखल झाली असून, त्याची चौकशी करून कार्यवाही करू, असे बालविकास प्रकल्पाधिकारी व्ही.एम. मोरे यांनी सांगितले.

Web Title: Documents are the same; Another job!