विष प्राशन करून डॉक्टरची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:42 IST2017-09-08T00:42:53+5:302017-09-08T00:42:53+5:30
येथील डॉ. अंकुश सखाराम बागल (३२, रा. पोहेटाकळी, ता. पाथरी, जि. परभणी) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.

विष प्राशन करून डॉक्टरची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : येथील डॉ. अंकुश सखाराम बागल (३२, रा. पोहेटाकळी, ता. पाथरी, जि. परभणी) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.
परतूर तालुक्यातील चिंचोली शिवारातील एका शेतात गुरुवारी डॉ. बागल यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या बाजूला एक दुचाकी व विषारी द्रव आढळून आला. ‘बीएचएमएस’ पदवीधारक डॉ. बागल मंठा येथे खाजगी प्रॅक्टीस करत होते. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
परतूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर डॉ. बागल यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी व अडीच वर्षांचा मुलगा आहे. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हेड काँस्टेबल एम. पी. सुरडकर तपास करत आहेत.