डॉक्टरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2017 21:44 IST2017-05-13T21:41:09+5:302017-05-13T21:44:08+5:30

शिरूर कासार : येथील डॉ. भगवान रघुनाथ चेमटे (वय ६७) यांनी आजारपणाला कंटाळून शनिवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Doctor's Suicide | डॉक्टरची आत्महत्या

डॉक्टरची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : येथील डॉ. भगवान रघुनाथ चेमटे (वय ६७) यांनी आजारपणाला कंटाळून शनिवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
डॉ. चेमटे हे मूळचे एकनाथवाडी येथील रहिवासी आहेत. व्यवसायानिमित्त ते शिरूर येथे स्थायिक झाले होते. मूळव्याधाच्या आजाराने ते त्रस्त होते. विविध दवाखान्यांमध्ये उपचार करूनही त्यांचा आजार बरा होत नव्हता. त्यामुळे ते निराश झाले होते. शनिवारी सकाळी त्यांच्या पत्नी बाहेरगावी गेल्या होत्या. डॉ. भगवान चेमटे घरात एकटेच होते. त्यांनी घरातील आडूला दोर लावून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे कृत्य पाहून नातेवाईकांना धक्काच बसला. त्यांनी आरडाओरड केली. शिरूर कासार पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
त्यांचा मुलगा जगदीश चेमटे यांच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. तपास पोहेकाँ अशोक शेळके हे करीत आहेत.

Web Title: Doctor's Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.