काठमांडूत अडकलेले डॉक्टर सुखरूप परतले
By Admin | Updated: April 28, 2015 00:30 IST2015-04-28T00:18:17+5:302015-04-28T00:30:21+5:30
लातूर : नेपाळमधील भूकंपात अडकलेले लातूरचे तिन्ही डॉक्टर्स सुखरुप परतले. काठमांडू येथून सोमवारी पहाटे ४ वाजता विमानाने दिल्ली

काठमांडूत अडकलेले डॉक्टर सुखरूप परतले
लातूर : नेपाळमधील भूकंपात अडकलेले लातूरचे तिन्ही डॉक्टर्स सुखरुप परतले. काठमांडू येथून सोमवारी पहाटे ४ वाजता विमानाने दिल्ली व तेथून पुण्यापर्यंत तिघांनी विमानाने प्रवास केला़ त्यानंतरचा प्रवास खाजगी वाहनाने केला़
काठमांडू येथे २५ व २६ एप्रिल असे दोन दिवस बालरोगतज्ज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद होती़ त्यात लातूरचे डॉ़ दत्ता गोजमगुंडे आणि डॉ़ संदीपान साबदे हे सहभागी होते़ डॉ़ संदीपान साबदे यांच्या पत्नी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ़ क्रांती साबदे याही काठमांडुला गेल्या होत्या़ भूकंपामुळे हे तिघे डॉक्टर काठमांडूत अडकले़ परतीच्या प्रवासासाठी त्यांचे विमान निश्चित झाले नसल्याने त्यांना शनिवारी व रविवारी काठमांडू येथेच थांबावे लागले़ शिवाय, दुसऱ्या दिवशीही झालेल्या भूकंपामुळे आणि नैसर्गिक वातावरण योग्य नसल्याने आपत्ती व्यवस्थापनासाठी परदेशातील विमाने काठमांडूच्या विमानतळावर उतरत नव्हती़ सोमवारी पहाटे ४ वाजता ते विमानाने दिल्लीकडे निघाले़ डॉ़दत्ता गोजमगुंडे हे विमानाने सोमवारी सकाळी ७ वाजता पुण्याला पोहोचले़ त्यानंतर ते खाजगी वाहनाने लातूरला आले आहेत. दरम्यान, विमान उपलब्ध झाले नसल्याने डॉ़ साबदे दाम्पत्यांना दिल्लीतच थांबावे लागले़ त्यानंतर अन्य विमानाने रात्री ९ वाजता ते पुण्यापर्यंत पोहोचले़ तेथून ते दोघे लातूरला येत आहेत़, अशी माहिती डॉ़वर्धमान उदगीरकर यांनी दिली़