डॉक्टरांचा उद्या एकदिवसीय संप
By Admin | Updated: March 18, 2017 23:23 IST2017-03-18T23:19:49+5:302017-03-18T23:23:07+5:30
लातूर : धुळे येथील डॉक्टरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सोमवारी २० मार्च रोजी रुग्णालये बंद ठेवून आंदोलन करण्यात येणार आहे.

डॉक्टरांचा उद्या एकदिवसीय संप
लातूर : धुळे येथील डॉक्टरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सोमवारी २० मार्च रोजी रुग्णालये बंद ठेवून आंदोलन करण्यात येणार असल्याचे असोसिएशनच्या वतीने कळविण्यात आले आहे.
राज्यभरात अलिकडे डॉक्टरांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ लातूर शहरातील डॉक्टरांकडून सोमवारी आपली रुग्णालये बंद ठेवण्यात येणार आहेत. या एकदिवसीय बंद दरम्यान गांधी चौकात सकाळी १० ते दुपारी ४ या कालावधीत डॉक्टरांकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या बंदमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, एनआयएमए, आयडीए, होमिओपॅथिक असोसिएशन आदी डॉक्टरांच्या संघटना सहभागी होणार असल्याचे असोसिएशनने कळविले. (प्रतिनिधी)