सलग तिसऱ्या दिवशी केली डॉक्टरांची चौकशी
By Admin | Updated: July 12, 2015 00:41 IST2015-07-12T00:41:50+5:302015-07-12T00:41:50+5:30
उस्मानाबाद : जिल्हा रूग्णालयातून गंभीर गुन्ह्यातील आरोपितांच्या पलायन प्रकरणातील तिसऱ्या दिवशीही दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची शहर पोलिसांनी एक तास कसून चौकशी केली़

सलग तिसऱ्या दिवशी केली डॉक्टरांची चौकशी
उस्मानाबाद : जिल्हा रूग्णालयातून
गंभीर गुन्ह्यातील आरोपितांच्या पलायन प्रकरणातील तिसऱ्या दिवशीही दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची शहर पोलिसांनी एक तास कसून चौकशी केली़ हाणामारी प्रकरणातील जखमी आरोपितांनी जिल्हा रूग्णालयातून धूम ठोकल्यानंतर शहर पोलिसांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना समन्स काढले होते़ या समन्सनंतर पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरूवारी पोलिसांनी मागितलेली कागदपत्रे सादर केली़ यावेळी पोलीस अधिकाऱ्यांची या वैद्यकीय अधिकाऱ्यांची कसून चौकशी करीत झाडाझडती घेतली़ त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इनचार्ज, परिचारिका, परिचारक व सेवकाला अशा चार कर्मचाऱ्यांची साधारणत: अडीच तास चौकशी करण्यात आली़ तर तिसऱ्या दिवशी शनिवारीही पोलिसांनी आरोपितांच्या पलायन प्रकरणात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेतले होते़ त्यांचीही साधारणत: एक ते सव्वा तास चौकशी करण्यात आली़ दरम्यान, पोलिसांकडून वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची तिसऱ्या दिवशीही चौकशी करण्यात आली असून, कागदपत्रांचीही पाहणी सुरू आहे़ चौकशीअंती कोणता निष्कर्ष निघतो आणि पोलीस अधिकारी कोणती भूमिका घेतात ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे़ दरम्यान, पोलिसांना फरार आरोपित शिंदे बंधूंचा शोध मात्र, अद्यापही लागलेला नाही़