दिवसभर उपवास ठेवून दिली रुग्णसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:27 IST2017-10-03T00:27:01+5:302017-10-03T00:27:01+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) सोमवारी (दि.२) करण्यात येणारे उपोषण उपवासात बदलले

Doctors on fasting | दिवसभर उपवास ठेवून दिली रुग्णसेवा

दिवसभर उपवास ठेवून दिली रुग्णसेवा

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) सोमवारी (दि.२) करण्यात येणारे उपोषण उपवासात बदलले. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील डॉक्टरांनी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास पकडून सेवा सुरळीत ठेवल्याचे ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. रमेश रोहिवाल यांनी सांगितले.
पीसीपीएनडीटी अ‍ॅक्टमध्ये सुधारणा करण्यात यावी, क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट या कायद्यातील जाचक तरतुदी रद्द करण्यात याव्यात, डॉक्टरांवरील होणारे हल्ले टाळण्यासाठी कठोर कायद्या व्हावा, एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर घेण्यात येणाºया एनएएनटी ही परीक्षा रद्द व्हावी, वैद्यकीय हलगर्जीपणाच्या प्रकरणांत देण्यात येणाºया नुकसानभरपाईच्या रकमेवर योग्य मर्यादा घालण्यात यावी, अशा विविध मागण्या ‘आयएमए’तर्फे करण्यात आल्या आहेत.
आयएमए शाखेच्या ठिकाणी स्थानिक डॉक्टर्स उपोषण करणार होते. परंतु एका ठिकाणी बसून उपोषण करण्याऐवजी रुग्णालयात रुग्णसेवा देऊन उपवास करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘आयएमए’तर्फे सकाळी ८.३० वाजता समर्थनगर येथील आयएमए हॉल येथे सभा घेण्यात आली.
महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवासाची सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. रमेश रोहिवाल, ‘आयएमए’चे सचिव डॉ. संतोष रंजलकर, डॉ. अनंत कडेठाणकर, डॉ. वंदना काबरा, डॉ. पर्सी जिल्ला, डॉ उज्ज्वला दहीफळे, डॉ. पवन तिवारी, डॉ. प्रशांत सोनवटीकर, डॉ. दत्ता कदम, डॉ. प्रशांत जाधव, डॉ. यशवंत गाडे आदी उपस्थित होते.
शहरातील तीनशेपेक्षा अधिक डॉक्टरांनी उपवास पकडून सहभाग नोंदविल्याचे डॉ. रंजलकर यांनी सांगितले. रुग्णसेवेवर काहीही परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. शासनाने आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, असे ‘आयएमए’तर्फे सांगण्यात आले.

Web Title: Doctors on fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.