शहरातील डॉक्टरांचे आज उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:34 IST2017-10-02T00:34:04+5:302017-10-02T00:34:04+5:30
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहरातील अॅलोपॅथी डॉक्टर्स विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. २) समर्थनगर येथील आयएमए हॉलसमोर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपोषण करणार आहेत.

शहरातील डॉक्टरांचे आज उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहरातील अॅलोपॅथी डॉक्टर्स विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. २) समर्थनगर येथील आयएमए हॉलसमोर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपोषण करणार आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) ६ जून रोजी केंद्र शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे उपोषण करण्याचा निर्णय ‘आयएमए’ने घेतला आहे. स्थानिक डॉक्टर्स एकत्र येऊन उपोषण करणार आहेत; मात्र या उपोषणादरम्यान कोणतेही रुग्णालय बंद राहणार नाही, रुग्णांची असुविधा होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचे ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. रमेश रोहिवाल, सचिव डॉ. संतोष रंजलकर यांनी सांगितले.
सकाळी ८.३० वाजता आयएमए हॉल येथे महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात येईल. त्यानंतर स्थानिक पदाधिकारी मार्गदर्शन करतील. मागण्यांच्या मसुद्यावर सह्या करून सदर निवेदन मुख्यमंत्री, राज्यपाल आणि पंतप्रधानांना पाठविण्यात येणार आहे.