शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

डाॅक्टर साहेब, खूप टेन्शन आले, काय करू? जाणून घ्या एक्स्पर्ट ओपिनियन 

By संतोष हिरेमठ | Updated: August 24, 2023 19:36 IST

टेन्शन येणे नैसर्गिक आहे. पण ते पकडून ठेवणे नुकसानकारक आहे.

छत्रपती संभाजीनगर : हल्ली अगदी शालेय मुलेदेखील टेन्शन आल्याचे म्हणताना दिसतात. दैनंदिन जीवनात अनेक कारणांनी टेन्शन म्हणजेच ताणतणावाला सामारे जावे लागते. थोडीशी काळजी तर टेन्शन सहजपणे दूर होऊ शकते. याबाबत अनेक प्रश्नांवर एक्स्पर्ट ओपिनियन दिली आहे घाटी रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डाॅ. प्रदीप देशमुख यांनी.

मोबाइल वापराचे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का?मोबाइलचा वापर योग्य प्रमाणात केला पाहिजे. मोबाइलच्या अतिवापरामुळे निद्रानाश, एकाग्रता कमी होणे, चिडचिडेपणा, सहनशीलता कमी होणे, एकटेपणा, थकवा, डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवतात.

टेन्शन येते म्हणजे काय होते?टेन्शन येणे नैसर्गिक आहे. पण ते पकडून ठेवणे नुकसानकारक आहे. टेन्शन येते म्हणजे एखाद्या विशिष्ट विचारांची डोक्यात (मेंदूमध्ये) गर्दी होते किंवा विचारांचा गोंधळ होतो. भविष्यात आपल्यासोबत काहीतरी वाईट घडेल किंवा आपल्याला पेलवणार नाही, असे काही घडेल, याची चिंता वाटत राहते. डोके जड पडणे किंवा सुन्न होणे, चिडचिडेपणा, निद्रानाश, कामात लक्ष न लागणे, उत्साह कमी होणे, आम्लपित्ताचा त्रास, भूक मंदावणे आदी लक्षणे दिसून येतात.

टेन्शन कसे दूर करायचे?मला टेन्शन आलेच नाही पाहिजे, हा अट्टाहास सोडा. थोडेफार टेन्शन भविष्यात येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी लागणाऱ्या पूर्वतयारीसाठी, व्यवस्थापनासाठी गरजेचे आहे. तणाव कमी करण्यासाठी मन स्थिर असणे आवश्यक आहे. मन स्थिर करण्यासाठी व्यायाम, शारीरिक (मैदानी) खेळ, ध्यानधारणा, संवाद, वाचन, छंद जोपासणे गरजेचे आहे.

टेन्शन आल्यास काय करू नये?टेन्शन दूर होण्यासाठी धूम्रपान, मद्यपान किंवा इतर ड्रग्सचे सेवन, व्हिडीओ गेम खेळणे, मोबाइलचा अतिवापर, चहा, कॉफीचे अतिसेवन टाळावे. या सर्व कृती म्हणजे तात्पुरते पलायन. परंतु त्यातून दीर्घकालीन गंभीर परिणाम होतात. त्यामुळे त्यापासून दूरच राहिलेले बरे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्यMental Health Tipsमानसिक आरोग्य