शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

डॉक्टरांनी वाचविले दोघींचे पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:08 AM

दुर्मिळ अशा गुडघ्यातील कर्करोगाने त्रस्त दोन युवतींचे पाय खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी कापावे लागणार असल्याचे सांगितले; परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातील डॉक्टरांनी हाडांच्या कर्करोगाची अतिशय दुर्मिळ आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून दोघींचे पाय वाचविले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दुर्मिळ अशा गुडघ्यातील कर्करोगाने त्रस्त दोन युवतींचे पाय खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी कापावे लागणार असल्याचे सांगितले; परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातील डॉक्टरांनी हाडांच्या कर्करोगाची अतिशय दुर्मिळ आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून दोघींचे पाय वाचविले.उषा वधेकर (२५, रा. आष्टी, जि. बीड) आणि शिवकन्या शिरसाले (२३, रा. निलंगा, जि. लातूर) या दोघींवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या दोघींच्या एका पायाच्या गुडघ्याला सूज आली होती. त्यामुळे असह्य वेदनेने त्या त्रस्त होत्या. तपासणीनंतर गुडघ्यातील कर्करोगाचे निदानझाले.यावरील उपचारासाठी खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दोघींना गुडघ्यापासून पाय काढण्याचे सांगून शस्त्रक्रियेचा खर्च २ ते ३ लाख रुपये सांगितला. दोघींची परिस्थिती हालाखीची होती. या रुग्णांना घाटीतील डॉक्टरांची माहिती मिळाली आणि त्या उपचारासाठी अस्थिव्यंगोपचार विभागात दाखल झाल्या. विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत थोरात यांनी बायोप्सीद्वारे कर्करोगाचे निदान केले.दोघींना पाय वाचविण्याची शास्वती देऊन त्यावरील गुंतागुतीच्या शस्त्रक्रियेविषयी सखोल माहितीदिली.दोन्ही रुग्णांनी सहमती देताच शस्त्रक्रिया करण्यात आली. अशा शस्त्रक्रियांसाठी मुंबई, पुणे येथे जाण्याची वेळ रुग्णांवर येते; परंतु घाटीतही ही शस्त्रक्रिया होत असल्याने रुग्णांची गैरसोय टाळून आर्थिक खर्च वाचविता येत असल्याचे या दोन्ही शस्त्रक्रियांवरून स्पष्ट झाले.शस्त्रक्रि येसाठी डॉ. चंद्रकांत थोरात यांच्यासह डॉ. एन. के. कपाडिया, डॉ. मुक्तदीर अन्सारी, डॉ. रमाकांत भिवसन, डॉ. उमाकांत करमळकर, डॉ. अभिजित मोरे, डॉ. उमेश काकडे, बधिरीकरणशास्त्र विभागातील डॉ. राजश्री विरशिद (सोनवणे), डॉ. सुचिता जोशी, डॉ. संतोष, इन्चार्ज सिस्टर माधुरी कुलकर्णी, शोभा साळवे यांच्यासह ब्रदर्स, सिस्टर्सनी परिश्रम घेतले. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांचे मार्गदर्शन लाभले.