डॉक्टरला साडेपाच लाखांचा गंडा

By Admin | Updated: July 3, 2016 00:47 IST2016-07-03T00:25:06+5:302016-07-03T00:47:02+5:30

औरंगाबाद : रिलायन्स विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शहरातील डॉक्टरशी गोड गोड बोलून त्यांना विमा पॉलिसी आणि शेअरमध्ये पैसे गुंतविण्याचे आमिष दाखवून तब्बल ५ लाख ६२ हजार ९९९ रुपयांचा गंडा घातला.

The doctor has five hundred and fifty lakh rupees | डॉक्टरला साडेपाच लाखांचा गंडा

डॉक्टरला साडेपाच लाखांचा गंडा

औरंगाबाद : रिलायन्स विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शहरातील डॉक्टरशी गोड गोड बोलून त्यांना विमा पॉलिसी आणि शेअरमध्ये पैसे गुंतविण्याचे आमिष दाखवून तब्बल ५ लाख ६२ हजार ९९९ रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी डॉक्टरने दिलेल्या तक्रारीवरून रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बालाजीनगर येथील रहिवासी डॉ. सुरेंद्र अमरसिंग दीक्षित (५५) यांनी रिलायन्स विमा कंपनीकडून २०११ मध्ये एक विमा पॉलिसी खरेदी केली होती. ते नियमित विमा हप्ता भरत असताना २०१३ मध्ये कंपनीकडून त्यांना फोन यायला लागले. त्यावेळी फोन करणाऱ्यांनी जुनी पॉलिसी रद्द करून नवीन दोन पॉलिसी घ्या, तुम्हाला जास्त लाभ होईल असे सांगितले. जुन्या पॉलिसीचे पैसे तुम्हाला परत मिळतील, असे त्यांनी सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून डॉक्टर दीक्षित यांनी दोन विमा पॉलिसी खरेदी केल्या. काही दिवसांनंतर त्यांनी कंपनीशी संपर्क साधून जुनी पॉलिसी बंद करणार होता, त्याचे काय झाले असे विचारले तेव्हा तुम्ही आॅनलाईन पॉलिसी खरेदी केली असल्याने त्याचा आमच्याशी संबंध नसल्याचे कंपनीने त्यांना कळविले. त्यामुळे त्यांनी कंपनीकडे लेखी तक्रार केली. दरम्यान, १३ आॅक्टोबर २०१५ रोजी रिलायन्स कंपनीचे डेप्युटी मॅनेजर दक्ष मेहता यांनी त्यांना फोन करून त्यांच्या तक्रारीविषयी चौकशी केली.

Web Title: The doctor has five hundred and fifty lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.