कंटेनरखाली चिरडून डॉक्टरचा मृत्यू; चालक फरार

By Admin | Updated: October 25, 2014 23:48 IST2014-10-25T23:39:47+5:302014-10-25T23:48:21+5:30

नळदुर्ग : दुचाकीला ओव्हरटेक करताना कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात डॉक्टरचा मृत्यू झाला़ हा अपघात शुक्रवारी सकाळी केरूर शिवारात घडला असून,

The doctor dies after the container crushes; Driver absconded | कंटेनरखाली चिरडून डॉक्टरचा मृत्यू; चालक फरार

कंटेनरखाली चिरडून डॉक्टरचा मृत्यू; चालक फरार


नळदुर्ग : दुचाकीला ओव्हरटेक करताना कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात डॉक्टरचा मृत्यू झाला़ हा अपघात शुक्रवारी सकाळी केरूर शिवारात घडला असून, अपघातानंतर फरार झालेल्या कंटेनर चालकाविरूध्द नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी सांगितले की, वडजी (ता़दक्षिण सोलापूर) येथील डॉ़ ज्ञानेश्वर पंढरीनाथ पाटील (वय-३५) हे शुक्रवारी सकाळी जळकोट (ता़तुळजापूर) येथील त्यांचा दवाखाना उघडण्यासाठी दुचाकीवरून (क्ऱ एम़एच़१३- डी़सी़९०३८) जात होते़ ते केरूर शिवारात आले असता वळणावर पाठीमागून आलेल्या कंटेनरने (क्ऱटी़एस़०८-०६९२) दुचाकीस जोराची धडक दिली़ अपघातात डॉ़ पाटील हे कंटेनरच्या पाठीमागील चाकात चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ घटनेनंतर कंटेनरचालक फरार झाला असून, या प्रकरणी दत्तात्रय जनार्धन चिवरे-पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालकाविरूध्द नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास हेकॉ बजरंग सरफाळे हे करीत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: The doctor dies after the container crushes; Driver absconded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.