शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

हजार मंदिरांचे छत्रपती संभाजीनगर, ४०० वर्षांचा इतिहास आहे का ठाऊक?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 21, 2023 13:43 IST

अनिल मुंगीकर यांनी दोन वर्षांत घेतला सहस्त्र मंदिरांचा शोध

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरात किती मंदिरे आहेत, असा प्रश्न कोणी तुम्हाला विचारला तर तुम्ही अनुत्तरित व्हाल. कारण, त्याची आकडेवारी आपल्यासमोर नाही किंवा ते जाणून घेण्याचा विचारही कधी मनात आला नसेल; पण आनंदाची बातमी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक डॉ. अनिल मुंगीकर यांनी दोन वर्षांत शहरभर फिरून तब्बल १ हजार मंदिरांचा शोध घेतला. ते येथेच थांबले नाहीत तर त्यांनी त्या मंदिरांचा इतिहास व त्याचे फोटो काढून १० खंड तयार केले. आता हाच दस्तऐवज छत्रपती संभाजीनगरातील आध्यात्मिक ठेवा बनला आहे. 

१० खंडांत शहरातील १ हजार मंदिरांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक खंडामध्ये १०० मंदिरांचा समावेश आहे. हे एक मोठे ऐतिहासिक व धार्मिक कार्य त्यांनी केले असून, आपल्या पुढील पिढ्यांसाठी हा अनमोल वारसा असणार आहे. शहरात सुमारे ४०० वर्षांपासूनची मंदिरे आहेत; तसेच मागील वर्षी बांधलेल्यापर्यंत नवीन मंदिरांचा समावेश आहे.

या सर्वांनी बांधले एक-एक मंदिरमुंबईतील मम्मादेवीचे मंदिर, गोव्यातील नागरिकांचे ‘पाणाजी माता’ मंदिर, सिंधी समाजाचे भगवान झुलेलाल महाराजांचे मंदिर, बंगाली समाजाने बांधलेले कालिकामातेचे मंदिर आहेच. शिवाय केरळमधून आलेल्या लोकांनी बांधलेले साताऱ्यातील अय्यप्पा मंदिर, राजपूत समाजाचे छावणीतील गुडी मंदिर, नवाबपुरातील कबीरपंथी मंदिर, नवनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि गोगा महाराज ते बालकृष्ण महाराज व निपटनिरंजन महाराज, महानुभाव आश्रम ही सर्व मंदिरे शहराचे आध्यात्मिक वैभव ठरत आहेत.

वैविध्यपूर्ण मंदिरेछत्रपती संभाजीनगरात २०१८ ते २०१९ या काळात १ हजार मंदिरांचा शोध घेतला. त्यात ४०० वर्षे जुनी बोटावर मोजण्याइतकी मंदिरे आहेत. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळातील व स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची मंदिरे आहेत. जुन्या मंदिरांत कोरीव नक्षीकाम बघण्यासारखे आहे. काही जुन्या मंदिरांचा आता जीर्णोद्धार केला आहे; पण मूळ गाभारा तोच ठेवण्यात आला आहे. प्रत्येक मंदिराचा इतिहास वेगवेगळा आहे. भावसिंगपुऱ्यातील खोल बारवात असलेले महादेव-पार्वतीचे समोरासमोरील मंदिरही देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मंदिर आहे. यानिमित्ताने १ हजार देवदेवतांचे दर्शन झाले, १० खंड तयार झाले. आपल्या हातून मंदिराचा संदर्भग्रंथ तयार झाल्याचा आनंद मनात आहे.-प्रा. डाॅ. अनिल मुंगीकर

कोणाची किती मंदिरे? हनुमान २११ मंदिरेविविध देवींची १६८ मंदिरे, गणपतीची १३७ मंदिरे, महादेवाची ११७ मंदिरे, श्रीदत्ताची ५७ मंदिरेविठ्ठल-रुख्मिणी ५५ मंदिरेसाईबाबा ३३ मंदिरेश्रीकृष्ण २७ मंदिरेबालाजी २२ मंदिरेश्रीराम २१ मंदिरेशनी १९ मंदिरेअन्य देवदेवतांची ४६ मंदिरे

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTempleमंदिरSocialसामाजिक