रेल्वेने अन्य राज्यांमध्ये जाताय का? आधी कोरोनाची टेस्ट करून घ्या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:05 IST2021-07-07T04:05:31+5:302021-07-07T04:05:31+5:30

संतोष हिरेमठ औरंगाबाद : कर्नाटक सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वे प्रवाशांसाठी आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केला. कोरोना लसीचा कमीत ...

Do trains go to other states? Test the corona first ...! | रेल्वेने अन्य राज्यांमध्ये जाताय का? आधी कोरोनाची टेस्ट करून घ्या...!

रेल्वेने अन्य राज्यांमध्ये जाताय का? आधी कोरोनाची टेस्ट करून घ्या...!

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कर्नाटक सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वे प्रवाशांसाठी आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केला. कोरोना लसीचा कमीत कमी एक डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असलेल्यांना प्रवासाची मुभा दिली आहे. असाच निर्णय अन्य ठिकाणी घेण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेने अन्य राज्यांत जाताना रेल्वे तिकिटाबरोबर या गोष्टींकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

काही दिवसांपूर्वी कोरोना निगेटिव्ह अहवालाशिवाय राजस्थानच्या स्टेशनवर उतरताच येणार नाही. त्यामुळे प्रवाशांनी हा अहवाल सोबत बळगण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले होते. औरंगाबादमार्गे सध्या आठवड्यातून एकदा जयपूर एक्स्प्रेस धावते. राजस्थानमध्ये प्रवास करण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ तपासणीचा अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक करण्यात आला. महाराष्ट्रातून राजस्थानमधील कोणत्याही रेल्वे स्टेशनवर उतरण्यापूर्वी ७२ तासांच्या आतील ‘आरटीपीसीआर’ अहवाल निगेटिव्ह असणे आवश्यक असल्याचे उत्तर पश्चिम रेल्वेच्या प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांनी एका पत्राद्वारे राजस्थान सरकारचा हवाला देऊन कळविले होते. त्यानंतर लसीकरण झालेल्या असेल तरीही प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु प्रत्येक राज्यांत, स्थानिक पातळीवर वेगवेगळा निर्णय घेण्यात आले आहे. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी या गोष्टींचाही विचार करण्याची गरज आहे.

----

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

-सचखंड एक्स्प्रेस

-नंदीग्राम एक्स्प्रेस

-देवगिरी एक्स्प्रेस

-जनशताब्दी एक्स्प्रेस

-तपोवन एक्स्प्रेस

-अजंता एक्स्प्रेस

-रेणिगुंठा एक्स्प्रेस

-मराठवाडा एक्स्प्रेस

--------

या रेल्वे कधी सुरू होणार?

- काचीगुडा-नगरसोल पॅसेंजर

-निजामाबाद-पुणे पॅसेंजर

-नांदेड - दौंड पॅसेंजर

-जालना-नगरसोल डेमू पॅसेंजर

-नांदेड-नगरसोल पॅसेंजर

------

पॅसेंजर कधी सुरू होणार?

- रेल्वेच्या अन्य विभागांत, इतर राज्यांत पॅसेंजर रेल्वे सुरु करण्यात आलेल्या आहेत. परंतु नांदेड विभागातून धावऱ्या पॅसेंजर रेल्वे कधी धावणार, याकडे प्रवाशांचे डोळे लागले आहे.

- औरंगाबाद-हैदराबाद ही पॅसेंजर रेल्वे विशेष रेल्वे म्हणून धावत आहे. रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी पॅसेंजर रेल्वे महत्त्वपूर्ण ठरते.

- काही पॅसेंजर रेल्वे एक्स्प्रेस म्हणून तर काही डेमू म्हणून चालविण्यासंदर्भात हालचाली सुरू आहे. पॅसेंजर रेल्वे सुरू होणार काही नाही, याकडे लक्ष लागले आहे.

--------

कोरोना टेस्ट, लसीकरण प्रमाणपत्र बाळगा

- रेल्वेने प्रवास करताना विशेषत: परराज्यांत जाताना संबंधित रेल्वेस्टेशनवरील कोणत्या गोष्टींची पडताळणी केली जाते, याची माहिती घेणे गरजेचे आहे. त्यानुसार कोरोना टेस्ट, लसीकरण प्रमाणपत्र जवळ बाळगले पाहिजे.

- औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर सचखंड एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी केली जाते. परंतु कोरोना टेस्ट, लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी केली जात नाही.

-----

मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेंना गर्दी

- मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांसाठी जनशताब्दी, तपोवन, नंदीग्राम, देवगिरी एक्स्प्रेस उपलब्ध आहेत. कोरोनाचे निर्बंध कमी झाल्यानंतर प्रत्येक रेल्वेला प्रवाशांची गर्दी पहायला मिळत आहे.

- मुंबईला जाण्यासाठी चार ते पाच रेल्वे उपलब्ध असल्याने सध्या तरी कोणत्याही रेल्वेचे आरक्षण एकदा दोन दिवसांपुरते वेटिंगवर असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

--------

मास्क वापरावा

सचखंड एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांची रेल्वेस्टेशनवर आरटीपीसीआर तपासणी केली जाते. सध्या रेल्वेगाड्यांना गर्दी होत आहे. प्रवाशांनी प्रवासात आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे. मास्कचा वापर करावा.

- लक्ष्मीकांत जाखडे, स्टेशन व्यवस्थापक

Web Title: Do trains go to other states? Test the corona first ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.