शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

दामदुपटीचे आमिष दाखवून करोडोंना गंडा

By admin | Updated: January 23, 2015 00:58 IST

औरंगाबाद : दामदुपटीचे आमिष दाखवून वटेश्वर अ‍ॅग्रो अँड रिअल इस्टेट प्रा.लि. कंपनीने अनेकांना करोडोचा गंडा घातला असून, चितेगाव येथील

औरंगाबाद : दामदुपटीचे आमिष दाखवून वटेश्वर अ‍ॅग्रो अँड रिअल इस्टेट प्रा.लि. कंपनीने अनेकांना करोडोचा गंडा घातला असून, चितेगाव येथील शेतकऱ्याने सिडको पोलीस ठाण्यात कंपनीच्या संचालकांविरुद्ध तक्रार दिली आहे. याविषयी माहिती देताना फौजदार हरीश खटावकर म्हणाले की, चितेगाव येथील मंगलसिंग भोपळे यांनी सिडको येथील कार्यालयात ५० हजार रुपये भरले होते. अशाच प्रकारे १११ जणांनीदेखील रक्कम गुंतवली असून, जवळपास ६३ लाख ५४ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाली आहे. जालन्याच्या मस्तगड परिसरात मुख्य शाखा असून, सिडको एन-७ येथे वटेश्वर अ‍ॅग्रो अँड रिअल इस्टेट प्रा.लि. कंपनीने गतवर्षी शाखा उघडली होती. केबीसी, सुपार पॉवरचे प्रकरण गाजत असतानाच जालन्याच्या वटेश्वर अ‍ॅग्रो कंपनीने दामदुपटीचे आमिष दाखवून जालना, नांदेड, परभणी, बुलडाणा येथील अनेकांना करोडो रुपयांना गंडविल्याचे उघड झाले आहे. कंपनीचे संचालक भीमराव रामजी वैद्य (रा. अंबड), संजय शिवाजी उफाड, संतोष शिवाजी उफाड (रा. नेर) व कंपनीच्या संचालकांनी तीन वर्षांत दामदुपटीचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना फसविले आहे.कंपनीने गुंतवणूकदारांना कमिशन देण्यासाठी चेकसारखे दिसणारे व्हाऊचर बनविले होते. यात ३० महिन्यांपर्यंत मिळणाऱ्या रकमेचा उल्लेख केला होतो; परंतु जूनपर्यंत दिलेले व्हॉऊचर वटवून देण्यास कंपनीकडून टाळाटाळ सुरू होती. जालन्याचे संचालक शिवाजी वळसे, संजय उफाड, संतोष उफाड यांनी करोडो रुपयांसह पळ काढल्याचे निदर्शनात आले. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार खटावकर अधिक तपास करीत आहेत.