बेपत्ता महिलेचा शोध लागेना; नातेवाईक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:46 IST2017-09-03T00:46:32+5:302017-09-03T00:46:32+5:30
हिंगोली तालुक्यातील बळसोंड परिसरातील आनंदनगर येथील महिला चिमुकलीला घेऊन बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिली होती. ७ दिवस उलटूनही महिलेचा शोध लागला नाही. त्यामुळे महिलेच्या घरी महालक्ष्मीपूजनही झाले नव्हते.

बेपत्ता महिलेचा शोध लागेना; नातेवाईक हैराण
लोकमत न्यूज नेटवर्क
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बळसोंड परिसरातील आनंदनगर येथील महिला चिमुकलीला घेऊन बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिली होती. ७ दिवस उलटूनही महिलेचा शोध लागला नाही. त्यामुळे महिलेच्या घरी महालक्ष्मीपूजनही झाले नव्हते.
ललिता संदीप बिरंगणे (२२) असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला पती व सासू-सासºयासोबत अहमदनगर जिल्ह्यातील नारायणगाव येथे काम करण्यासाठी गेले होते. परंतु लक्ष्मीपूजन असल्याने तिला पतीने २६ आॅगस्ट रोजी माहेरी सोडले होते. पती परत जाताच ललिता घरात कोणालाही काही न सांगता निघून गेली. तर याच भागातील काही नागरिकांनी आॅटोमध्ये गेल्याचे महिलेच्या वडिलांना सांगितले. ७ दिवस उलटनूही महिलेचा अद्याप शोध लागलेला नाही.
महिलेचे आई-वडील दौंड, पुणे, अकोला, परळी येथे जाऊनही काहीच उपयोग झालेला नाही. तसेच पोलिसांनाही वारंवार विचारणा केली जात आहे. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने महिलेच्या नातेवाईकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.