शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पोकळ आश्वासने नको, दुष्काळ जाहीर करा

By admin | Updated: August 12, 2015 01:00 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड तीन वर्षांपासून पडलेल्या दुष्काळाने आमचे जगण्याचे गणित बिघडले आहे. जनावरांना चारा नाही. पिण्याचे पाणी ४० किलो मीटरवरून आणावे लागते.

व्यंकटेश वैष्णव , बीडतीन वर्षांपासून पडलेल्या दुष्काळाने आमचे जगण्याचे गणित बिघडले आहे. जनावरांना चारा नाही. पिण्याचे पाणी ४० किलो मीटरवरून आणावे लागते. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी हातउसणे घेतलेले पैसे परत द्यायचे कसे? असा प्रश्न आहे. नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. ‘एवढी भयावह परिस्थिती असतानाही जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर होत नाही, यामुळे आमचा दुष्काळी दौऱ्यांवर येणाऱ्या पथकांवरचा विश्वासच उडालायं’ अशा तीव्र शब्दात शेतकऱ्यांनी आपली मते व्यक्त केली. दुष्काळ जाहीर करण्यासाठी अजून माणसं मरायची वाट पहाताय काय? असा सवालही यावेळी चौसाळ्याच्या शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाची गाडी अडवून विचारल्याने पथकातील अधिकाऱ्यांची गोची झाली.दुष्काळाने होरपळलेल्या खरीप पिकांची पहाणी करण्यासाठी मंगळवारी केंद्रीय पथक बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पथकात केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्र सिंघ, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जि. प. सीईओ नामदेव ननावरे, कृषी अधीक्षक रमेश भताने, डॉ. विकास सुर्यवंशी यांच्यासह गेवराई तहसीलदार चंद्रकांत सूर्यवंशी यांची पथकात उपस्थिती होती. चौसाळा परिसरातील पाच ते सहा गावच्या शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यामध्ये सयाजी शिंदे, निलेश गुंजाळ, बाबूराव नाईकवाडे, यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.