बाबासाहेबांना मर्यादित ठेवू नका
By Admin | Updated: January 15, 2016 00:11 IST2016-01-14T23:55:10+5:302016-01-15T00:11:45+5:30
औरंगाबाद : ‘बाबासाहेबांना आपण एकाच समाजापुरते अडकवून ठेवले आहे, असे मला वाटते. संविधानाचे लिखाण, समता याच्या व्यतिरिक्तही बाबासाहेबांनी खूप काही काम केले आहे

बाबासाहेबांना मर्यादित ठेवू नका
औरंगाबाद : ‘बाबासाहेबांना आपण एकाच समाजापुरते अडकवून ठेवले आहे, असे मला वाटते. संविधानाचे लिखाण, समता याच्या व्यतिरिक्तही बाबासाहेबांनी खूप काही काम केले आहे. परंतु त्यांच्या या कामावर फारशी चर्चा होताना दिसत नाही,’ असे विधान खा. सुप्रिया सुळे यांनी ‘भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने’ या विषयावर बोलताना केले. यशवंतराव प्रतिष्ठान (मुंबई), नवभारत केंद्र (औरंगाबाद), नवमहाराष्ट्र युवा अभियान व सरस्वती भुवन शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नामविस्तार दिनानिमित्त गुरुवारी गोविंदभाई श्रॉफ सभागृह येथे ‘भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
यावेळी आ. हेमंत टक ले, दत्ता बाळसराफ, आ. सतीश चव्हाण, आ.राजेश टोपे, आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आ. प्रकाश गजभिये आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी स. भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर उपस्थित होते. डॉ. जहीर अली व डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची उल्लेखनीय भाषणे झाली.
मुकुंद भोगले, नंदकिशोर कागलीवाल, सचिन मुळे, डॉ. श्रीरंग देशपांडे, अॅड. दिनेश वकील, डॉ. बिराजदार, नीलेश राऊत यांची विशेष उपस्थिती होती. श्रीराम पोतदार यांनी संचालन केले. डॉ. संदीप शिसोदे यांनी आभार मानले.