‘माता-पित्यांचे मन दुखवू नका’

By Admin | Updated: February 4, 2017 23:33 IST2017-02-04T23:30:57+5:302017-02-04T23:33:23+5:30

बीड : माता-पित्यांची सेवा करणे हाच आपल्या जीवनाचा संकल्प करावा असा संदेश प्रज्ञायोगी दिगंबर जैनाचार्य गुप्तिनंदिजी गुरूदेव यांनी दिला.

'Do not hurt the parents' mind' | ‘माता-पित्यांचे मन दुखवू नका’

‘माता-पित्यांचे मन दुखवू नका’

बीड : माता-पित्यांची सेवा करणे हाच आपल्या जीवनाचा संकल्प करावा. त्यांचे मन दुखावेल असे कोणतेही कृत्य करु नका, तुम्ही त्यांची संस्कारित मुले आहात याचा माता-पित्यांना अभिमान वाटू द्या, असा मौलिक संदेश प्रज्ञायोगी दिगंबर जैनाचार्य गुप्तिनंदिजी गुरूदेव यांनी शनिवारी दिला.
जालना रोडवरील भगवान दिगांबर मंदिरात सुरू असलेल्या पंचकल्याण महोत्सवात शेकडो बालक-बालिकांचा भाग्योदय संस्कार (उपनयन संस्कार) पार पडला. याप्रसंगी गुप्तीनंदीजी गुरूदेव महाराज यांचे मार्गदर्शन झाले.
व्यासपीठावर मुनीश्री वैराग्यसागरजी, मुनीश्री सुयशगुप्तजी, मुनीश्री श्रीचंद्रगुप्तजी, आर्यिका श्रीकुशलवाणी माताजी, आर्यिका श्री आस्थाजी माताजी, आर्यिका श्री सुनितीमति माताजी, आर्यिका श्री सुज्ञानश्री माताजी, क्षुल्लक श्री सुधर्मगुप्तजी,क्षुल्लक श्री धर्मगुप्तजी, क्षुल्लक श्री सत्यश्री, ब्र.केशरबाई अम्माजी, ब्र.सावित्री, ब्र.रोहित भैय्या, ब्र.धर्मनाथ भैय्या यांची उपस्थिती होती.
गुप्तीनंदीजी म्हणाले, जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार वाढतो, धर्माला ग्लानी येते, तेव्हा साधूसंत, मुनी सज्जानांच्या रक्षणासाठी महापुरूषांचा जन्म होतो. जैन दर्शनात जन्मकल्याणकाचे विशेष वर्णन व महत्त्व सांगितलेले आहे. प्रभू आगमनाने सर्व सृष्टी मंगलमय होते, असेही ते म्हणाले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: 'Do not hurt the parents' mind'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.