भाविकांची गैरसोय होऊ देऊ नका

By Admin | Updated: April 16, 2016 23:53 IST2016-04-16T23:48:41+5:302016-04-16T23:53:47+5:30

तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची चैत्री पौर्णिमा यात्रा १९ ते २३ एप्रिल या कालावधीत होत आहे़

Do not allow the devotees to be inconvenienced | भाविकांची गैरसोय होऊ देऊ नका

भाविकांची गैरसोय होऊ देऊ नका

चैत्री यात्रा : प्रशांत नारनवरे यांच्या सूचना
तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची चैत्री पौर्णिमा यात्रा १९ ते २३ एप्रिल या कालावधीत होत आहे़ या यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे दाखल होणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी दिल्या़
चैत्री यात्रेनिमित्त शनिवारी शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते़ यावेळी पोनि माधव गुंडीले यांनी मातंगी देवी रस्त्यावरील अतिक्रमणे काढावीत, मोटार सायकल पार्किंग व्यवस्था करावी चारचाकी पार्किंग व्यवस्था असली तरी पावत्या फाडल्या जात नाहीत, दीपक चौकात पार्किंगकडे जाण्याचा मार्गावर सूचनाफलक लावावे, मेन गेटवर आळीपाळीने कर्मचारी ठेवावेत आदी मुद्दे मांडले़ यावेळी जिल्हाधिकारी नारनवरे यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी, या समितीने उपाययोजनांबाबत सर्वे करावा, समितीत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, मंदीर प्रशासनासह इतर अधिकारी राहावेत, २४ तास विद्युत व्यवस्था करावी, डिपींची दुरूस्ती करावी, मंदिरात पाण्याची सुविधा करावी, पाण्याची तपासणी आरोग्य विभागाने करावी, पालिका प्रशासनाने शहर स्वच्छता ठेवावी, पार्किंग व्यवस्था करावी, विना नंबरप्लेटच्या वाहनांवर कारवाई करावी, मातंगी देवी मंदिराकडील अतिक्रमण हटवावे, आरोग्य विभागाने दोन रूग्णवाहिका तैनात कराव्यात, २४ तास आरोग्य विभागाचे पथक तैनात ठेवावे, हॅकींग झोन तयार करून व्यापाऱ्यांना व्यवस्था करून द्यावी बांगड्या विक्री करणाऱ्या महिलांची व्यवस्था करावी आदी सूचना केल्या़बैठकीस डॉ़ तेजस चव्हाण, तहसीलदार काशिनाथ पाटील, मंदीरचे तहसीलदार सुजित नरहिरे, नगराध्यक्षा अ‍ॅड मंजुषा मगर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले, डॉ़ धनंजय चाकूरकर, डॉ़ बेलापट्टे, पोनि माधव गुंडीले यांच्यासह विविध शासकीय, निमशासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, राजकीय पदाधिकारी उपस्थित होते़
बैठक : जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
‘मी आय हेल्प यू’
मंदीर प्रशासनाने ‘मी आय हेल्प यू’ अशा स्वयंसेवक कर्मचारी नेमावेत़ हे स्वयंसेवक कर्मचारी भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्नशील रहावेत, पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या़
‘बॅनर ऐवजी पाणी द्या’
भीषण पाणीटंचाईच्या काळात चैत्री यात्रा भरत आहे़ त्यामुळे शहरासह परिसरातील राजकीय पदाधिकाऱ्यांसह संघटनांनी डिजिटल बॅनर लावण्याऐवजी भाविकांसाठी पाण्याची सोय करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले़

Web Title: Do not allow the devotees to be inconvenienced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.