डीएमआयसीची गती मंदावणार
By Admin | Updated: December 22, 2014 01:21 IST2014-12-22T00:29:42+5:302014-12-22T01:21:02+5:30
औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात युद्धपातळीवर भूसंपादन करण्यात आले.

डीएमआयसीची गती मंदावणार
औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात युद्धपातळीवर भूसंपादन करण्यात आले. प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा यादृष्टीने प्लॅनिंग स्टेजचे काम अंतिम टप्प्यात असताना शासनाने दुष्काळाचे कारण दाखवून एमआयडीसीमधील अधिकाऱ्यांची शनिवारी तडकाफडकी बदली केली. हे पद तसेच रिक्त ठेवण्यात आल्यामुळे प्रकल्पाची गती मंदावणार आहे.
शनिवारी शासनाने महसूल विभागातील १६ प्रतिनियुक्तींवर इतर विभागांमध्ये काम करणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मुंबई, पुणे व इतर मोठ्या शहरांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या करण्यात आल्याने ते हवालदिल झाले आहेत. कारण अनेकांची मुले संबंधित शहरांमध्ये शिक्षण घेत आहेत.