शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

सिग्नलवर डीजेचे वाहन पेटले; कर्ज काढून व्यवसाय सुरू केलेल्या तरुणाचे ३५ लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 12:14 IST

चितेगावच्या तरुणाने कर्ज काढून उभारला होता व्यवसाय, ३५ लाखांचे नुकसान झाल्याचा मालकाचा दावा

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाण्याकडून सेव्हनहिल उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या डीजेच्या टेम्पोने (एमएच ०८ एच ५६४५) अचानक पेट घेतल्यामुळे एकच धावपळ उडाली. बघ्यांनी गर्दी केल्यामुळे काही काळ वाहतुकीची जालना रोडवर कोंडी झाली. दरम्यान, या आगीमुळे डीजेसह वाहनाचे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा मालकाने केला आहे. त्याचवेळी तीन वर्षांपूर्वी कर्ज काढून डीजेचा व्यवसाय उभारला असल्याची माहिती मालकाने 'लोकमत'शी बोलताना दिली.

चितेगाव येथील नितीन विनायक घोडके यांनी तीन वर्षांपूर्वी डीजेचा व्यवसाय सुरू केला होता. त्यासाठी बंद टेम्पोमध्ये डीजेचे सर्व साहित्य बसविलेले होते. त्यातच जनरेटरही ठेवण्यात आले होते. चिकलठाणा परिसरात एका लग्नाची सुपारी असल्यामुळे रविवारी (दि. १६) डीजेसह गाडी त्याठिकाणी गेली होती. सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चिकलठाणावरून हा टेम्पो चितेगावच्या दिशेने निघाला होता. टेम्पाेत चालक स्वप्निल खरवडे होते. मालक दुचाकीवर पुढे हाेते. टेम्पो खंडपीठाच्या सिग्नलवर येताच आतमधुन मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. तेव्हा आजूबाजूच्या वाहनचालकांची एकच धावपळ उडाली. सुरुवातीला धूर आल्यानंतर आतमधून आग बाहेर पडू लागली. 

त्याचवेळी अग्निशमन विभागाच्या पथकास कळविण्यात आले. अग्निशमनचे ड्युटी इन्चार्ज मोहन नरके यांच्यासह जवान गोरखनाथ जाधव, दिनेश वेलदोडे, बाबासाहेब ताठे, आदिनाथ बकले व बाबासाहेब गव्हाड यांचे पथक गाडीसह घटनास्थळी पोहोचले. अवघ्या काही वेळातच लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर उपस्थित जमावाने टेम्पोला धक्का मारून रस्त्यावरून बाजूला केले. त्यानंतर खोळंबलेली वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, डीजेच्या टेम्पोमध्येच जनरेटर ठेवण्यात आलेले होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे गरम होऊन जनरेटरने पेट घेतला असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचवेळी लागलेली आग टेम्पोच्या डिझेलच्या टाकीकडे गेली नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचेही उपस्थितांनी सांगितले.

डीजेचे साहित्य जळून खाकटेम्पोमध्ये असलेले डीजेची मशीन, बारा स्पीकर, एक मशीन मिक्सर, ॲम्प्लिफायर पाच, पीच पट्टी, जनरेटर आणि दोन बॅटरी जळाल्या आहेत. त्याचवेळी टेम्पोचा इतर भागही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. त्यात सर्व मिळून ३५ लाख रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचे डीजे मालक नितीन घोडके यांनी सांगितले. तसेच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खासगी सावकारांकडून कर्ज काढल्याचेही त्यांनी सांगितले. त्यातच डीजेचा विमा नसल्यामुळे संपूर्ण नुकसान मालकालाच सहन करावे लागणार आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfireआगFire Brigadeअग्निशमन दल