शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

चोरांची दिवाळी ! औरंगाबादेत २४ तासांत तब्बल १३ घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 12:29 IST

चोरट्यांनी दिवाळीच्या सुटी दरम्यान आठवड्यात १७ घरे फोडली असल्याचे पुढे आले आहे

औरंगाबाद : शहरातील विविध भागात मागील २४ तासांत १३ घरे फोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मागील आठ दिवसांत हा आकडा १७ वर पोहोचला असून, या चोरीच्या घटनेतील एकही आरोपी पकडण्यात शहर पोलिसांना यश मिळालेले नाही.

दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी शहरातील अनेक कुटुंबे गावाकडे गेली होती. या काळात गारखेडा परिसर, किलेअर्क, सिडको, बीड बायपास या भागात चोरांनी घरे फोडली आहेत. रविवारी रात्री वानखेडेनगर, एन १३ भागात आणखी पाच घरे फोडून चोरांनी पोलिसांनी झोप उडवली. पुंडलिकनगरमध्ये एकाच रात्री पाच घरे फोडल्याची घटना रविवारी समोर आली. वानखेडेनगर येथील एकाच गल्लीमध्ये समोरासमोरील पाच घरे फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. संदीप सुहास साळुंके हे बाहेरगावी गेले होते. चोराने घर फोडत दहा हजारांची रोकड लांबवली. त्यांच्याच शेजारी राहत असलेले दीपक श्रीचंद पवार हे व त्यांची पत्नी बाहेरगावी गेले होते. चोराने त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून १४ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, चेन, लॉकेट, पैंडल, अंगठी व इतर असे पावणेतीन लाखांचे दागिने लंपास केले. याशिवाय गजानन गिरनारे यांचे घर फोडून पाच ग्रॅमचे कानातले, तीन ग्रॅमचे मणी असे आठ ग्रॅमचे दागिने लांबविले. मयूर संदीप देवकर यांच्या घरातुन मुद्देमाल लंपास करण्यात आलेला नाही. याशिवाय एक घर रिकामेच होते. त्यातूनही काही चोरीला गेलेले नाही. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले.

श्वान, ठसेतज्ज्ञांना पाचारणबेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी केली. यानंतर श्वानपथकासह ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वान काही अंतरापर्यंत जाऊन घुटमळला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हींची पाहणी केली. घटनास्थळी पोलीस उपायुक्त अपर्णा गिते, सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ यांनीही पाहणी केली.

तक्रार देण्यास नकारवानखेडेनगरात फोडलेल्या पाच घरांपैकी तीन जण तक्रार करण्यासाठी पुढे आले. उर्वरित दोघांनी नकार दिला. याशिवाय पुंडलिकनगर हद्दीतही पाच घरफोडीच्या घटनांपैकी केवळ एकच जण तक्रारीसाठी पुढे आला. इतर ठिकाणीही अनेक जण घरे फोडल्यानंतरही तक्रार देण्यास पुढे येत नसल्याची माहिती आहे.

गुन्हेगार मोकाटदिवाळीच्या पूर्वी शहर पोलिसांनी ‘आपला शेजारी खरा पहारेकरी’ हे अभियान राबविले होते. यानंतरही चोऱ्या होत आहेत. सर्व चोरटे मोकाट आहेत. यामुळे गुन्हे शाखेसह पोलीस ठाण्यांतील विशेष पथके कोणती कामे करीत आहेत. यावर शंका उपस्थित होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादtheftचोरी