छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सुटीत राज्यभरात विविध ठिकाणी पर्यटनाला निघालेल्या अनेक पर्यटकांचा उत्साह अक्षरशः ‘गॅस’प्रमाणे काही क्षणात उडाला. कारण, काही ठिकाणी पंप बंद, तर काही ठिकाणी ‘सीएनजी संपला’ अशा पाट्या लागल्या. त्यामुळे सीएनजी वाहनांतून निघालेल्या प्रवाशांचा वेळ प्रवासात नव्हे, तर सीएनजी पंप शोधण्यात आणि मिळालेल्या पंपावर तासन्तास रांगेत थांबण्यातच गेला. याविषयी पर्यटकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पर्यावरणपूरक वाहन वापरणाऱ्या नागरिकांना दिवाळीत पर्यटनासाठी बाहेर पडताना भलतीच शिक्षा भोगावी लागली. सीएनजी पंपांची संख्या अत्यल्प असल्याने छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूरसह विविध ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या मार्गांवर सीएनजी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. टँकरद्वारे पुरवठा हाेणाऱ्या बहुतांश पंपावर गेल्या दोन ते तीन दिवसांत काही वेळातच ‘सीएनजी संपला...’ अशा पाट्या लागत होत्या.काही ठिकाणी सीएनजीसाठी १ ते २ तास प्रतीक्षा करावी लागली. लांबलचक रांगा, उकाडा आणि गाडीत बसलेली लहान मुले यामुळे अनेकांचा संयम सुटला. काही ठिकाणी वादावादी झाली. ‘सीएनजी मिळेल का नाही?’ या प्रश्नानेच प्रवाशांचा मूड आणि दिवाळी दोन्ही बिघडवली.
सीएनजी स्टेशनवर पोहोचल्यावर भरण्यासाठी फक्त तीन ते पाच मिनिटे लागतात; पण नंबर येण्यासाठी किमान अर्धा ते एक तास थांबावे लागते, असे वाहनचालकांनी सांगितले. आणखी सीएनजी पंप उभारणे आणि ऑनलाइन पंप प्रणाली सुरू करणे आवश्यक आहे. वाढती वाहने आणि मर्यादित पायाभूत सुविधा लक्षात घेता, प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असेही मत वाहनचालकांनी मांडले.
टँकरवरच भिस्तराज्यात अनेक ठिकाणी अजूनही सीएनजी पाइपलाइन पोहोचलेली नाही, त्यामुळे अनेक पंप टँकरवर अवलंबून आहेत. त्यामुळे सीएनजी संपल्यानंतर वाहनचालकांना अधिक प्रतीक्षा करावी लागते.
पंप, वाहनांची स्थिती...राज्यात सीएनजी पंपांची संख्या सुमारे १ हजार ८४२ आहेत. तर आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्यात २ लाख ४६ हजार ७९२ सीएनजी वाहनांची नोंदणी झाली.
Web Summary : Diwali travelers faced CNG scarcity, with stations running dry and long queues causing significant delays and frustration. Limited infrastructure needs urgent attention.
Web Summary : दीवाली पर यात्रा कर रहे लोग सीएनजी की कमी से जूझ रहे हैं, स्टेशनों पर गैस खत्म और लंबी कतारों से भारी देरी और निराशा हुई। सीमित बुनियादी ढांचे पर तत्काल ध्यान देने की आवश्यकता है।