शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
3
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
4
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
5
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
6
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
7
पुतीन परतले, पुढे...?
8
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
9
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
10
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
11
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
12
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
13
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
15
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
16
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
17
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
18
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
19
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
20
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
Daily Top 2Weekly Top 5

Diwali 2025: ‘बायकोचे १२००, माझे हजार येणे, ते पैसे आले तर दिवाळी धुमधडाक्यात’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 18:36 IST

Diwali 2025: सणाच्या प्रकाशात देणाऱ्यांच्या पैशावर अवलंबून ‘कामगारां’ची दिवाळी

- प्राची पाटीलछत्रपती संभाजीनगर : ‘बायकोचे १२००, माझे हजार येणे आहेत. ते पैसे आले तर दिवाळी धुमधडाक्यात करू’ हे शब्द आहेत मातीकाम करणाऱ्या कामगाराचे. त्यांची दिवाळी ‘देणाऱ्यांच्या’ पैशांवर अवलंबून आहे. सण तोंडावर असताना कामगारांच्या डोळ्यात प्रतीक्षा कायम आहे. दिवाळीच्या आदल्या दिवशीपर्यंत पैशांची वाट पाहावी लागते. मालकाने पैसे दिले तरच घरात किराणा भरला जातो. मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलते आणि तेव्हाच फराळाचा सुगंध पसरतो. अन्यथा दिवाळी म्हणजे एक दिवास्वप्न ठरते.

पैसे येणे बाकी‘२५ वर्षं प्लंबिंगचे काम करतो. पण आजही दिवाळीचे नियोजन पैशावरच ठरते,’ असे आदिनाथ निकम सांगतात. त्यांची महिन्याची कमाई १२ हजारांच्या आसपास. सध्या ते दोन ठिकाणांहून येणाऱ्या पैशांची वाट बघत आहेत. ‘एकजण म्हणतोय उद्या देतो, दुसराही देणार म्हटलाय, पण पैसे हातात पडल्याशिवाय काही खरे नाही. पत्नी माती काम करून कमावते’.

कामच मिळाले नाहीभास्कर जाधव ३० वर्षांपासून बिगारी काम करतात. ‘काम असले तरच आमची दिवाळी,’ असे ते म्हणतात. यावर्षी सगळे साहेब लोक गावाला गेले, त्यामुळे कामच कमी मिळाले. पैसे आले तर दोघे मिळून छोटी दिवाळी करू. त्यांचे हे साधे वाक्य ऐकूनही दिवाळीचा खरा अर्थ समजतो.

दिवाळीच्या दिवशीही कामबिगारी कामगार संतोष फिसफिसे म्हणतात, ‘आमची दिवाळी काम देणाऱ्यांवर अवलंबून असते. आठवड्याचे पैसे आम्ही घेतो. त्यामुळे सणाच्या आदल्या दिवशीही हात रिकामे असतात, तर फरशीचे काम करणारे संदीप आंबिलढगे सांगतात, ‘आमच्या क्षेत्रात एक मालक दुसऱ्यावर अवलंबून. वरच्याने पैसे दिले तेव्हाच आमच्या हातात येतात. भाऊबीजेला बहिणीला ओवाळणी देण्यासाठी दिवाळीच्या दिवशी दुपारपर्यंत काम करतो’. विकास आगळे म्हणतात, ‘कधी काम असते तर कधी नसते, सर्व अशाश्वत. म्हणून दिवाळीची काही खात्री नाही’. मातीकाम करणारे संजय अंभोरे, मनोहर मरपाते, सोमीनाथ ढगे म्हणाले, ‘दिवाळीत उधारीवरच सण साजरा करावा लागतो. किराणा, कपडे, फराळ सगळे कर्जावरच होते. मग पुढचे सहा महिने ते फेडण्यात जातात.’

यांचे हात रिकामकामगारांसाठीचे हजारो कोटी पडून आहेत. पण त्याचा खऱ्या कामगारांना काहीही फायदा नाही. ७० टक्के बोगस नोंदणी झाली आहे. त्यामुळे यांचे हात दिवाळीतही रिकामे राहिलेत.-मधुकर खिल्लारे, अध्यक्ष, कामगार संघटना

English
हिंदी सारांश
Web Title : Diwali hopes hinge on received wages for laborers' celebrations.

Web Summary : For laborers, Diwali joy depends on timely wages. Many await payments, relying on them for essentials like groceries and festive treats. Delayed wages cast a shadow, turning Diwali into a distant dream, highlighting their financial insecurity.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDiwaliदिवाळी २०२५