सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग बांधवांचा सत्कार
By | Updated: December 5, 2020 04:08 IST2020-12-05T04:08:31+5:302020-12-05T04:08:31+5:30
सोयगाव : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सोयगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने दिव्यांग बंधू-भगिणींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय ...

सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग बांधवांचा सत्कार
सोयगाव : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सोयगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने दिव्यांग बंधू-भगिणींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर कसबे, अपंग क्रांती आंदोलनाचे तालुकाध्यक्ष संदीप इंगळे, ज्येष्ठ नागरिक चंद्रास आप्पा रोकडे, अनिल लोखंडे, संजय मिसाळ व अपंग महिला मंगला जोहरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ, कसब, डॉ, केतन काळे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांचा सत्कार करण्यात आला.
जागतिक दिव्यांग दिनाचा सर्वत्र विभागाला विसर पडला आहे. मात्र ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आम्हा दिव्यांगांचा सत्कार केला. ही मोठी बाब आहे. असे मत प्रहारचे संदीप इंगळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात कोरोना काळात योद्धासारखे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. केतन काळे, डॉ. गोपाल देवडे, डॉ. देशराज मीना, ए. एस. सूर्यवंश, व्ही. डी. कारके, चेतन वाकलकर, सुनील वानखेडे, रविराज शेळके, महेंद्र चित्राल, भागवत बेटकर, दारासिंग राठोड, बबन रोकडे, सुनील मगरे, सीमा फुले, ईश्वर इंगळे, सुनील वानखेडे यांची उपस्थिती होती.
फोटो ओळ - ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने दिव्यांग बांधवांचा सत्कार करताना वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर, कर्मचारी.