अंजनवाडा वन समितीला विभागीय प्रथम पुरस्कार
By Admin | Updated: June 17, 2017 23:51 IST2017-06-17T23:47:43+5:302017-06-17T23:51:59+5:30
औंढा नागनाथ : राज्य शासनाच्या वतीने संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत पुरस्कारासाठी औंढा वनपरिक्षेत्रातील अंजनवाडा वन व्यवस्थापन समितीला मराठवाडा प्रशासकीय विभागातून प्रथम पुरस्कार जाहीर झाला

अंजनवाडा वन समितीला विभागीय प्रथम पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : राज्य शासनाच्या वतीने संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत पुरस्कारासाठी औंढा वनपरिक्षेत्रातील अंजनवाडा वन व्यवस्थापन समितीला मराठवाडा प्रशासकीय विभागातून प्रथम पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एम.एस. केंद्रे यांनी दिली आहे.
औंढा वनपरिक्षेत्रअंतर्गत आंजनवाडा येथील वनव्यवस्थापन समितीने सन १४-१५ या कालावधीत वनपरीक्षेत्र अधिकारी डी.एस. खुपसे, वनपाल संतोष दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षतोड थांब, वृक्षारोपण, मृदसंधारण, अतिक्रमण काढणे, अवैध चराई बंद करून जंगलामध्ये वणवा न भडकू देणे, वनसंरक्षण केल्यामुळे राज्यस्तरीय निवड समितीच्या वतीने १३ कामांची पाहणी केली. यात समितीत ९७ गुण मिळाले होते. १६ जून रोजी शासनाने पुरस्कार जाहीर केला असून वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगटीवार यांच्या हस्ते आहे. रोख १ लाख रुपये व मानचिन्ह देऊन केला जाणार जाणार आहे.