शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीला खंडपीठाचा दिलासा

By admin | Updated: October 9, 2014 00:50 IST

औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीने संपादित केलेल्या जमिनीवर मूळ मालकाने बांधकाम सुरू केले होते. त्यानंतर कृउबाने खंडपीठात याचिका दाखल केली असता संपादित जमिनीवर बांधकाम करणार नाही,

औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीने संपादित केलेल्या जमिनीवर मूळ मालकाने बांधकाम सुरू केले होते. त्यानंतर कृउबाने खंडपीठात याचिका दाखल केली असता संपादित जमिनीवर बांधकाम करणार नाही, अशी हमी मूळ मालकाने औरंगाबाद खंडपीठात दिल्याने कृउबाला दिलासा मिळाला आहे. याचिकेची सुनावणी दिवाळीच्या सुट्यांनंतर ठेवण्यात आली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार करण्यासाठी शासनाने २१ एप्रिल १९८९ रोजी जाधववाडी येथील जळगाव रोडलगत असलेली ३ हेक्टर ५ गुंठे जमीन संपादित केली होती. त्याबाबतचा मावेजाही शासनाने घोषित केला होता. जमिनीचे मूळ मालक श्रीनिवास खटोड, प्रेमदास मंत्री यांना आपली जमीन शासनास देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी मावेजाही स्वीकारला नाही. जमीन संपादन करण्याच्या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायलायात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथेही त्यांची याचिका फेटाळण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयाने निर्णय देताना या प्रकरणी कलम ४८ नुसार महसूलमंत्र्यांकडे दाद मागण्याची मुभा त्यांना दिली होती.याचिकाकर्त्यांनी महसूलमंत्र्यांकडे अर्ज सादर करून आपली जमीन भूसंपादनातून वगळण्यात यावी, अशी विनंती केली होती. तेव्हा तत्कालीन महसूलमंत्र्यांनी या जमिनीचा ताबा घेण्यास स्थगिती दिली होती. दरम्यान, आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महसूलमंत्र्यांनी या अर्जावर निर्णय दिला. त्यांच्या निर्णयानुसार भूसंपादनाच्या नवीन कायद्यानुसार जमिनीचे संपादन करावे. हे आदेश प्राप्त होताच जमीन मालकाने सदरील जमिनीवर जळगाव रस्त्याच्या बाजूने पत्र्याचे कुंपण घातले. त्यानंतर ते बांधकाम करणार असल्याचे दिसताच कृउबाने अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल करून या बांधकामास मज्जाव करण्याची विनंती केली. ही याचिका सुनावणीसाठी आली असता जमीन मालकातर्फे त्या जागेवर बांधकाम करण्यात येणार नाही, अशी हमी देण्यात आली. याचिकेची सुनावणी दिवाळीच्या सुट्यांनंतर होईल. जमीन मालकाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. विनायक दीक्षित यांनी बाजू मांडली.