जिल्ह्याचा दहावी सीबीएसईचा निकाल १०० %

By Admin | Updated: June 4, 2017 00:34 IST2017-06-04T00:32:36+5:302017-06-04T00:34:31+5:30

जालना : केंद्रीय माध्यमिक बोर्डाच्या वतीने मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी (सीबीएसई) परिक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला

District's SSC result of 100% | जिल्ह्याचा दहावी सीबीएसईचा निकाल १०० %

जिल्ह्याचा दहावी सीबीएसईचा निकाल १०० %

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : केंद्रीय माध्यमिक बोर्डाच्या वतीने मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी (सीबीएसई) परिक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यामध्ये शहरातील तिन्ही विद्यालयांचा निकाला १०० टक्के लागला आहे. यात यंदाही मुलींनीच बाजी मारत मुलांपेक्षा आपण सरस असल्याचे दाखवून दिले आहे.
शहरातील गोल्डन ज्युबिली, रेयान इंटरनॅशनल, आणि पोद्दार स्कूलच्या एकूण २२७ विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या दहावी परिक्षेसाठी बसले होते. शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
गोल्डन ज्युबिली स्कूलचा विद्यार्थी कृषी अक्षय मंत्री याने ९९ टक्के गुण घेत प्रथम येण्याचा मान
पटकावला.
पोद्दार स्कूलचा शिवम पालकर ९८.८० टक्के तर साया द्विज काबरा हिने ९८. ६०, टक्के गुण घेत व्दितीय क्रमाक पटकावला, साक्षी जगताप हिने ९८.४० गुण घेत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच गोल्डन ज्युबिली स्कूलची सारा अजय गट्टाणी हिने ९८.८ गुण मिळविले.
रेयान इंटननॅशनल स्कूची विद्यार्थीनी सृष्टी दंदाले हिने ९५.८ गुणे घेत शाळेतून पहिली आली आहे. तसेच निकीता राकेश लोहिया हिने ९८.६ गुण मिळविले. शहरातील तिन्ही स्कूलच्या अनेक विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी हिन्दी, गणित विज्ञानमध्ये १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत.
शहरातील या तिनही विद्यालयांनी उज्ज्वल निकालांची परंपरा यंदाही कायम राखली आहे. विद्यार्थ्यांचा सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमाकडे कल वाढत असल्याचे निकालावरुन दिसून येते.

Web Title: District's SSC result of 100%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.