खोडवेकर यांच्यावरील चौकशी अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:05 IST2017-08-06T00:05:13+5:302017-08-06T00:05:13+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या निवासस्थान व कक्ष दुरुस्ती प्रकरणात अप्पर विभागीय आयुक्त यांच्या नेतृत्वाखालील समितीकडून करण्यात येत असलेल्या चौकशीमुळे अधिकाºयांमध्ये खळबळ उडाली असून समितीचा अहवाल कधी येईल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

खोडवेकर यांच्यावरील चौकशी अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या निवासस्थान व कक्ष दुरुस्ती प्रकरणात अप्पर विभागीय आयुक्त यांच्या नेतृत्वाखालील समितीकडून करण्यात येत असलेल्या चौकशीमुळे अधिकाºयांमध्ये खळबळ उडाली असून समितीचा अहवाल कधी येईल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या निवासस्थान व कक्षावर वित्तीय मर्यादा डावलून ३१ लाख रुपयापेक्षा अधिक खर्च केल्या प्रकरणात आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या तक्रारीनंतर अप्पर विभागीय आयुक्त यांच्या नेतृत्वाखालील दोन सदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे.
या समितीने चौकशीला २१ जुलैपासून सुरुवात केली आहे. या प्रकरणात समिती, निवासस्थान व कक्षाच्या दुरुस्तीवर कशा पद्धतीने निधी खर्च करण्यात आला, या संदर्भातील तांत्रिक, प्रशासकीय मंजुरी कोणी दिली, वित्तीय मर्यादेचे उल्लंघन झाले आहे का इ. बाबींची चौकशी करणार आहे. चौकशीअंती हा अहवाल थेट ग्रामविकास मंत्र्यांना सादर केला जाणार आहे.
त्यामुळे ही चौकशी समिती काय अहवाल सादर करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.