जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर

By Admin | Updated: September 5, 2014 00:58 IST2014-09-05T00:24:33+5:302014-09-05T00:58:02+5:30

बीड : जिल्हा परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली. वीस शिक्षकांना शुक्रवार (दि.५) रोजी शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर पुरस्कार वितरण होणार आहे.

District Teacher Award Announced | जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर

जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर


बीड : जिल्हा परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली. वीस शिक्षकांना शुक्रवार (दि.५) रोजी शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर पुरस्कार वितरण होणार आहे.
चालू वर्षी २० जणांना गौरविले जाणार आहे. यात प्राथमिक विभागातील ११, माध्यमिकच्या ८ शिक्षकांचा समावेश आहे. शिवाय एक विशेष पुरस्कारही दिला जाणार आहे. रोख ५०० रुपये, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारपात्र शिक्षकांची पोलिस प्रशासनाकडून चारित्र्य पडताळणी केली आहे. आयुक्त, शिक्षण समितीने मान्यता दिल्याचे शिक्षणाधिकारी व्ही. डी. कुलकर्णी यांनी सांगितले.
शुक्रवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दुपारी १ वाजता पुरस्कार वितरण होणार आहे. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री सुरेश धस यांच्या उपस्थितीत वितरण केले जाईल. यावेळी खासदार रजनी पाटील, जि.प. अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांची विशेष उपस्थिती राहील. सीईओ राजीव जवळेकर, सभापती संदीप क्षीरसागर व जि. प. तील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे.
यांची झाली निवड
प्राथमिक विभाग: मंदाकिनी चव्हाण (हनुमंतवाडी ता. अंबाजोगाई), बाबासाहेब मुळीक (गंगापूर ता. आष्टी), सूमन जोगदंड (गंगनाथवाडी ता. बीड), पंडित ठोंबरे (पोखरी ता. गेवराई), सुनीता शिंदे (देवखेडा ता. माजलगाव), रमेश पवार (अंमळनेर ता. पाटोदा), प्रतिभा करपे (चिंचपूर ता. धारुर), बंडू राठोड (नागापूर ता. परळी), अयोध्या आंधळे (खोकरमोहा ता. शिरुर), कलिमोद्दीन बागे (उपळी ता. वडवणी)
माध्यमिक विभाग: नानासाहेब गायकवाड (दादेगाव ता. आष्टी), कांतीलाल लाड (पाली ता. बीड), शेख जावेद अहमद (कन्याशाळा, गेवराई), प्रल्हाद मक्कापल्ले (माध्यमिक शाळा केज), शंकर नवगणकर (कन्या शाळा, माजलगाव), बााजी खोत (माध्यमिक शाळा, धारुर), शास्त्री कांबळे (कन्या शाळा, परळी), केशव डोंगरे (फुलसांगवी ता. शिरुर)
कला, क्रीडा शिक्षकांसाठी विशेष पुरस्कार दिला जातो. त्यासाठी बीड तालुक्यातील पाली माध्यमिक शाळेतील शिक्षक दीपक रुपदे यांची निवड झाली.
तीन तालुक्यातून प्रस्ताव नाहीत
माध्यमिक विभागातील शिक्षकांच्या पुरस्कारांसाठी वडवणी, पाटोदा व अंबाजोगाई तालुक्यातून एकही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे या तालुक्यातील शिक्षक पुरस्काराला मुकले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: District Teacher Award Announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.