जिल्हा ‘स्वाईन फ्लू’ने पोखरला

By Admin | Updated: March 16, 2015 00:51 IST2015-03-16T00:45:13+5:302015-03-16T00:51:46+5:30

लातूर : लातूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे थैमान सूरु असून आतापर्यंत २२१ संशयित रुग्णावर उपचार करण्यात आले़ त्यातील २०२ रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले़

District swine flu | जिल्हा ‘स्वाईन फ्लू’ने पोखरला

जिल्हा ‘स्वाईन फ्लू’ने पोखरला



लातूर : लातूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे थैमान सूरु असून आतापर्यंत २२१ संशयित रुग्णावर उपचार करण्यात आले़ त्यातील २०२ रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले़ त्यापैकी ५९ रुग्णांना स्वाईन फ्लूची बाधा झाली होती. त्यातील आतापर्यंत १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ ५९ पैकी ४३ रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या दोन महिन्यापासून लातूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे़ लातूर शहरात आठ रूग्णांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे़ या आठ रुग्णामध्ये ४ महिलांचा समावेश आहे़ यातच दोन गरोदर महिलांचा समावेश आहे़ २ बालकांचा, २ पुरूषांचा समावेश आहे़ औसा तालुक्यात दोन स्वाईन फ्लू संययिताचा मृत्यू झाला आहे़ यामध्ये एका महिलेचा व एका पुरूषाचा समावेश आहे़ रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील एक पुरूष रुग्णांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे़ निलंगा तालुक्यात कोेतल शिवणी, निंबाळा येथील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे़ जळकोट तालुक्यातील वडगाव, जळकोट येथील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे़ अहमदपूर तालुक्यात एका पुरूषाचा मृत्यू झाला आहे़लातूर जिल्ह्यात आतापर्यंत स्वाईन फ्लू संशयित म्हणून १९३ जणांवर उपचार करण्यात आले आहे़ २०२ रुग्णांचे स्वॅब पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ व्हायरोलॉजी येथे पाठवण्यात आले होते़ त्यापैकी ५९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ त्यातील १६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़ ८४ जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत़ ३७ जणांचे स्वॅब हे रिजिक्ट झाले आहे़ २२ जणांचे अहवाल येणे बाकी आहेत़ ४३ स्वाईन फ्लूूबाधीत रुग्णावर उपचार करून त्यांना बरे करण्यात आले़ जिल्ह्यात उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयातील स्वाईन फ्लू कक्षात ५ संशयित रुग्णांवर उपचार करण्यात घेत आहेत़ तर निलंगा उपजिल्हा रुग्णालयातील स्वाईन फ्लू कक्षात ६ स्वाईन फ्लू संशयितावर उपचार करण्यात येत आहेत़ लातूर येथील सर्वोपचार रूग्णालयात ५ स्वाईन फ्लू संशयित रूग्णासह २ स्वाईन फ्लू बाधीत रूग्णावर उपचार करण्यात येत आहेत़ एका स्वाईन फ्लू बाधीत रूग्णाची प्रकृती उपचारार्थ गंभीर झाल्याने त्या रुग्णास व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे़ एकुण सहा रुग्णावर उपचार करण्यात येत आहे़ लातूर शहरातील खासगी रुग्णालायत चार स्वाईन फ्लू संशयितासह एका स्वाईन फ्लू बाधीत रूग्यावर उपचार करण्यात येत आहे़ सध्या तीन स्वाईन फ्लू बाधीत रुग्णांसह २५ स्वाईन फ्लू संशयितावर उपचार सुरू आहेत.

स्वाईन फ्लूने पूजा स्वप्नील गुप्ता (मंठाळे नगर लातूर), रजिया रौफखान पठाण (इस्लामपूरा लातूर,) गोदावरी जयराम पिटले (नाथनगर मळवाटीरोड लातूर), छाया विलास अर्थंमवार, (विशाल नगर लातूर), रुक्साना रफिक शेख (शास्त्री नगर लातूर), माधव गणेश सूर्यवंशी (साळेगल्ली लातूर), संस्कृती महादेव कासले (मंठाळे नगर), तुळशिराम माणिक कांबळे (म्हाडा कॉलनी लातूर), औसा तालुक्यातील प्रा़ मुलुकसहाब अकबर आली शेख, सिमा विजयकुमार वळसंगे, तर रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील देवीदास व्यंकटेश कुरे, निलंगा तालुक्यातील कोतल शिवणी येथील कविता सुधाकर शेळके, निंबाळा येथील आशाबाई शिवाजी फुलसूरे तर जळकोट तालुक्यातील वडगावच्या जयश्री संदीप मुंडे, जळकोट येथील लक्ष्मीबाई व्यंकटेश सूर्यवंशी, अहमदपूर तालुक्यातील शिवाजी गंगाधर मिथळकर यांचा यांचा मृत्यू झाला.

Web Title: District swine flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.