जिल्ह्यात थंटीची लाट ओसरतेय..
By Admin | Updated: December 28, 2015 00:16 IST2015-12-28T00:03:19+5:302015-12-28T00:16:01+5:30
जालना : शहरासह जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून अचानक थंंडीची लाट आली होती. पारा घसरल्याने थंडीत वाढ झाली होती. चौथ्या दिवशी मात्र थंडीची लाट ओसरू लागल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात थंटीची लाट ओसरतेय..
जालना : शहरासह जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून अचानक थंंडीची लाट आली होती. पारा घसरल्याने थंडीत वाढ झाली होती. चौथ्या दिवशी मात्र थंडीची लाट ओसरू लागल्याचे चित्र आहे. मागील तीन दिवसांपासून रात्रीचा पारा ८ अंश सेल्सीअसवर येऊन ठेवला होता. त्यात रविवारी दोन अंशांनी वाढ झाल्याने थंडी थोडी कमी जाणवत होती.
संपूर्ण जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून अचानक थंडी वाढली होती. तापमान घसरल्याने सर्वत्र हुडहुडी भरली होती. त्यामुळे नागरिकांना थंडीचा त्रास सहन करावा लागला.गेल्या तीन दिवसांपासून पारा दिवसा २६ ते २५ अंशावर तर रात्री ७ ते आठ अंशावर येऊन ठेपत असल्याने थंडीत मोठी वाढ झाली होती.
रविवारीही दिवसभर पारा २८ ते २५ अंशांवर होता. तर रात्री तो १० पर्यंत घसरला होता. गेल्या तीन दिवसांपासून पारा ७ ते ८ अंशावर होता. रविवारी २ अंशांनी त्यात वाढ झाल्याने मागील तीन दिवसांपेक्षा रविवारी रात्री थंडी थोडी ओसरली होती.तसेच जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, मंठा, परतूर तालुक्यातही तापमान २५ अंशावर आले होते. तसेच या तालुक्यात रात्री ९ ते १२ अंशावर तापमानाचा पारा घसरलेला होता. मागील तीन दिवसांच्या तुलनेत जिल्ह्यातील आठही तालुक्यांत २ ते ५ अंशांपर्यंत तापमान वाढल्यामुळे या तालुक्यांतही हुडहुडी थोडी कमी झाली.
रविवारी २ अंशांनी त्यात वाढ झाल्याने मागील तीन दिवसांपेक्षा रविवारी रात्री थंडी काहीशी ओसरली होती. तसेच जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, मंठा, परतूर तालुक्यातही तापमान २५ अंशावर आले होते. तालुक्यात रात्री ९ ते १२ अंशांवर तापमान घसरले होते. उबदार कपड्यांची मागणी मात्र वाढली आहे.