जिल्हा क्रीडा समिती ‘धृतराष्ट्रा’च्या भूमिकेत
By Admin | Updated: November 23, 2014 00:22 IST2014-11-22T23:49:47+5:302014-11-23T00:22:51+5:30
जालना : येथील जिल्हा क्रीडा संकुलात दर्जेदार खेळाडू तयार होण्याऐवजी दर्जाहीन सुविधांमुळे उदयोन्मुख खेळाडूंचे स्वप्न भंग पावत आहे. क्रीडा समितीनेही धृतराष्ट्राची भूमिका घेतली आहे.

जिल्हा क्रीडा समिती ‘धृतराष्ट्रा’च्या भूमिकेत
जालना : येथील जिल्हा क्रीडा संकुलात दर्जेदार खेळाडू तयार होण्याऐवजी दर्जाहीन सुविधांमुळे उदयोन्मुख खेळाडूंचे स्वप्न भंग पावत आहे. क्रीडा समितीनेही धृतराष्ट्राची भूमिका घेतली आहे.
दरम्यान, क्रीडा संकुलाची देखभाल करण्यासाठी जिल्हा क्रीडा समिती महत्वाची भूमिका पार पडते. असे असले तरी ही समितीही कागदी घोडे नाचविण्याचे काम करीत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
क्रीडा संकुलाची माहिती घेतली असता संकुलाचे अधिकृत उद्घाटनच झाले नसल्याचे कळले. साधारणपणे पंधरा- सोळा वर्षांपूर्वी हे संकुल वापरास सुरुवात झाली. अजतागायत हे संकुल कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेतच आहे. शासनाच्या क्रीडा धोरणानुसार खेळाडू अथवा स्पर्धा होत नसल्याचा आरोपही अनेकांनी केला. जिल्हा क्रीडा संकुलात खुले सभागृह, ४०० मीटर धावना पथ, पाच हजार प्रेक्षकांसाठी गॅलरी, जलतरण तलाव, बंदिस्त प्रेक्षागृह, हॉलिबॉल, कबड्डी, खो- खो, बास्केट बॉल, टेनिस आदी खेळांची क्रीडांगणांची असतात. मुला- मुलींसाठी वसतिगृह, मल्टीजिम, वेटलिफ्टिंग, फिजिकल एक्झरसाईझ हॉल, पाणीपुरवठा, ड्रेनेज, विद्युतीकरण, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत आदी बाबी समावेश असाव्यात. त्याचबरोबर क्रीडा साहित्य खरेदीचाही समावेश आहे. असे असले तरी येथील संकुलात वरील सुविधा असल्या तरी त्या कशा आहेत परिस्थितीवरुन लक्षात येते. राजकीय सभांमुळे येथील मैदानात खड्डे खोदण्यात आले होते. तेही थातूरमातूर बुजविण्यात आले. त्यामुळे मुख्य मैदानाचीही माती होत आहे. लाखोंचे व्यायाम साहित्य चोरीस
खेळाडूंसाठी सुसज्ज व अत्याधुनिक अशी व्यायाम शाळा आहे. या जिममधील काही साहित्य चोरीस तर काही गंजल्यामुळे निरोपयोगी ठरत आहे. व्यायाम होण्याऐवजी दुखापत होण्याची शक्यता अधिक आहे. बॉक्सिंग मॅटचे अतोनात नुकसान होत आहे. इनडोअर हॉलही दुरुस्ती आला आहे.
जिल्हा क्रीडा संकुलात क्रीडा समिती असते. जिल्हाधिकारी हे अध्यक्ष तर क्रीडाधिकरी हे सचिव असतात. त्याचबरोबर दोन अशासकीय सदस्यांचाही समावेश असतो. असे असले तरी क्रीडा समितीची बैठक अथवा काही उपाय योजना झाल्याचे ऐकिवात नाही.
४क्रीडा समितीने याची दखल घ्यावी अशी मागणी आता पुढे येत आहे. विशेषत: उदयोन्मुख खेळाडू या प्रकाराने प्रचंड अस्वस्थ आहेत. क्रीडा संकुलाच्या माध्यमातून दर्जेदार सुविधा तर राहिल्या दूर क्षुल्लक बाबीसुध्दा उपलब्ध नाहीत.