जिल्हाबाह्य समिती करणार तपासणी
By Admin | Updated: August 13, 2014 00:25 IST2014-08-13T00:11:39+5:302014-08-13T00:25:22+5:30
हिंगोली : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत जिल्हा मूल्यमापनात ३५ गावे पात्र ठरली आहेत.

जिल्हाबाह्य समिती करणार तपासणी
हिंगोली : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत जिल्हा मूल्यमापनात ३५ गावे पात्र ठरली आहेत. आता या गावांची तपासणी करण्यासाठी जालना येथील जिल्हाबाह्य मूल्यमापन समिती येणार असून हिंगोलीची समिती परभणी जिल्ह्यातील ३० गावांचे मुल्यमापन करणार आहे.
जिल्ह्यातील ५६५ पैकी ५१९ गावांना आतापर्यंत तंटामुक्तीचे पुरस्कार मिळाले असून यंदा उर्वरित ४६ पैैकी ३५ गावे या पुरस्काराच्या प्रतीक्षेत आहेत. २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यातील ५१९ गावे तंटामुक्ती मोहिमेमध्ये पुरस्कारास पात्र ठरली होती. यंदा १३ ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यंदा तंटामुक्ती मोहिमेच्या कार्यक्रमात थोडा बदल झाला. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापुर्वी बाह्यमुल्यमापन पुर्ण करून तंटामुक्त गावांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ३५ तंटामुक्त गावांचे बाह्यमूल्यमापन करण्यासाठी जालन्याची समिती येणार आहे. हिंगोली जिल्ह्याची समिती परभणी जिल्ह्यातील ३० गावांचे मुल्यमापन करणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधून निवडण्यात येणाऱ्या सदस्यांची समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर परभणीला जिल्हाबाह्य मूल्यमापनासाठी पाठवण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)
हिंगोलीची समिती परभणीला जाणार
तंटामुक्त गाव मुल्यमापनाबाबतचा आदेश नुकताच पोलीस मुख्यालयात प्राप्त झाला आहे. त्यानुसार संपुर्ण राज्यातील समित्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. (कंसात जिल्हाबाह्य मुल्यमापन समितीचे नाव)-जालना (हिंगोली), परभणी (नांदेड), हिंगोली (परभणी), बीड (औंरगाबाद), नांदेड (उस्मानाबाद), उस्मानाबाद (बीड), औरंगाबाद (जालना), अमरावती (यवतमाळ), सोलापूर (पुणे), कोल्हापूर (सातारा), बुलडाणा (अकोला), अकोला (अमरावती), वाशिम (बुलडाणा), यवतमाळ (वाशिम), नागपूर (गडचिरोली), वर्धा (नागपूर), चंद्रपूर (वर्धा), गडचिरोली (चंद्रपूर), ठाणे (रत्नागिरी), रायगड (सिंधुदुर्ग), रत्नागिरी (रायगड), सिंधुदुर्ग (ठाणे), नाशिक (अहमदनगर), धुळे (नंदुरबार), नंदुरबार (जळगाव), जळगाव (नाशिक), अहमदनगर (धुळे), पुणे (कोल्हापूर), सातारा (सांगली), सांगली (कोल्हापूर) .