शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

 दुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 19:22 IST

उपायोजनासनबंधीचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’ स्वतंत्रपणे शासनाला सादर करण्यात येणार असून हा जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देयासंदर्भात जि.प. अध्यक्षा डोणगावकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावा, या आशयाचा ग्राऊंड रिपोर्ट शासनाला सादर करण्यात येणार आहे. 

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील दुष्काळ सदृष्य स्थितीचे वास्तवचित्र अर्थात तातडिने कराव्या लागणाऱ्या उपायोजनासनबंधीचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’ स्वतंत्रपणे शासनाला सादर करण्यात येणार असून हा जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. 

मागील दहा दिवसांपासून जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी सर्व तालुक्यांतील कमी पर्जमान असलेल्या गावांना भेटी दिल्या. तेथील पिक परिस्थिती, वाडी- तांड्यावरील पिण्याच्या पाण्याची टंचाई आदींची पाहणी करुन शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यानंतर शासनामार्फत जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यात आली. त्यानंतर पुढील आठवड्यात जिल्हा परिषदेचे अधिकारी- पदाधिकारी पुन्हा एकदा जिल्ह्यातील परिस्थितीची पाहणी करणार आहेत. 

यासंदर्भात जि.प. अध्यक्षा डोणगावकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. गंगापूर, खुलताबाद, कन्नड, पैठण, सिल्लोड तालुक्यांमध्ये यंदा अत्यंत कमी पाऊस झाला. तब्बल ५० ते ६० दिवसांचा पावसाचा खंड आहे.  १६ आॅगस्टपासून तर जिल्ह्यात पाऊसच झालेला नाही. त्यामुळे जलसाठे कोरडे पडले आहेत. भूजल पातळी खोल गेली आहे. हातातोंडाला आलेली खरीपाची पिके वाया गेली आहेत. मक्याच्या कणसात दाणा भरण्याच्या काळातच पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे कणसात दाणे भरलेच नाहीत. कपासी, मका, सोयाबीन, बाजरी आदी खरीपाची सर्वच पिके वाया गेली आहेत. अनेक गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे सर्व साठे आरक्षित करुन खाजगी पाणी उपस्यावर निर्बंध घालणे गरजेचे आहे. लघू व मध्यम प्रकल्पांच्या संपादीत क्षेत्रातील खाजगी विहिरी अधिगृहित करण्यात याव्यात, कुपनलिका, विंधन विहिरी खोलवर घेण्यास बंदी घालण्यात यावी. एकंदरीत जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेता हा जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावा, या आशयाचा ग्राऊंड रिपोर्ट शासनाला सादर करण्यात येणार आहे. 

चारा छावण्यासाठी परवानगी द्यावीयासंदर्भात जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी परिवहन मंत्री दिवाकर रावते हे शासनाच्या वतीने जिल्ह्यात पाहणी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनाही जिल्ह्यातील विद्यमान परिस्थितीबाबत अहवाल सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चारा व पाण्याची टंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेमार्फत चारा छावण्या सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी व त्यासाठी आवश्यक तो निधी द्यावा, या आशची मागणीही करण्यात आली आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदdroughtदुष्काळ