जिल्हा कारागृह, न्यायालयीन कामांसाठी २५० कर्मचारी
By Admin | Updated: December 9, 2015 23:48 IST2015-12-09T23:34:03+5:302015-12-09T23:48:47+5:30
जालना : जिल्हा कारागृह आणि न्यायालयीन कामांसाठी स्वतंत्र २५० कर्मचारी देण्यात यावे, याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयांमार्फत शासनाकडे पाठविला असल्याची

जिल्हा कारागृह, न्यायालयीन कामांसाठी २५० कर्मचारी
जालना : जिल्हा कारागृह आणि न्यायालयीन कामांसाठी स्वतंत्र २५० कर्मचारी देण्यात यावे, याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयांमार्फत शासनाकडे पाठविला असल्याची माहिती प्रभारी पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
येथे नव्याने झालेल्या कारागृहासाठी आणि न्यायालयीन कामांसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते. जिल्हा पोलिस दलातीलच कर्मचारी या कामांसाठी देण्यात आहे.
जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यात आजरोजी सुमारे १६०० कर्मचारी संख्या आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरे मनुष्यबळ आहे. त्याचा पोलिसांच्या कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी शांतता समिती, पोलिस मित्र यांच्याकडून सातत्याने होत आहे. तसेच शहरासह जिल्ह्यात वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. वाहतूक शाखेतही ५० टक्के कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यातच शासनाच्या आदेशान्वये न्यायालयीन कामकाजांसाठी कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच येथे नव्याने झालेल्या जिल्हा कारागृहासाठीही जिल्हा पोलिस दलातीलच काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस दलात आणखी मनुष्यबळ कमी झालेले आहे. (प्रतिनिधी)