जिल्हाध्यक्षांना भाजपाकडून शह
By Admin | Updated: April 24, 2015 00:39 IST2015-04-24T00:19:06+5:302015-04-24T00:39:45+5:30
शिरीष शिंदे , बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक आता खऱ्या अर्थाने रंग येऊ लागला आहे. जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्या पत्नी सारीका पोकळे व भाऊ,गणेश पोकळे

जिल्हाध्यक्षांना भाजपाकडून शह
शिरीष शिंदे , बीड
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक आता खऱ्या अर्थाने रंग येऊ लागला आहे. जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्या पत्नी सारीका पोकळे व भाऊ,गणेश पोकळे यांनी पालकमंत्र्याच्या आदेशान्वये गुरुवारी अर्ज मागे घेतले. या प्रकारामुळे एका प्रकारे भाजपाने जिल्हाध्यक्षांनाच नाकारल्याची चर्चा आहे. आज, शुक्रवारी डीसीसी निवडणुकीसाठी भाजपाची अंतीम उमेदवारांची यादी दाखल केलेले अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी १६२ जणांचे अर्ज वैध ठरले होते. १८ एप्रिल पासून अर्ज मागे घेण्यास सुरुवात झाली होती. पहिल्या पाच दिवसात एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नव्हता मात्र अर्ज मागे घेण्याची तारीख जवळ येत असल्याने अर्ज मागे घेण्यास सुरुवात झाली. मंगळवार पर्यंत एकुण सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते तर गुरुवार पर्यंत हा आकडा २१ च्या घरात जाऊन पोहोचला आहे. शुक्रवार हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज दुपारनंतर सदरील निवडणुकीच्या आखाड्यात कोण राहील याची व्युव्हरचना आखली जाईल. डीसीसीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगेस सुरुवातीपासून उदासीन दिसून आली.
गुरुवारी पर्यंत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकी संदर्भात बैठक घेतली नाही. तर भाजपाने डीसीसी बँकेवर झेंडा लावण्याचा जणूृ पणच केला आहे. त्यामुळे डीसीसीच्या निवडणुकीकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपाने डीसीसी निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरु केली असून या संदर्भात गुरुवारी बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी निवडणुकीसाठी अंतिम उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आली. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने राष्ट्रवादी, भाजपाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात अर्ज मागे घेणार आहेत. यातून निवडणुकीची नेमकी स्थिती कळणार आहे.
मतदान पाच मे रोजी होणार असून, मतमोजणी सात मे रोजी पार पडणार आहे. १९ जागांसाठी १६२ जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. त्यानंतर आता २१ अर्ज मागे घेतले गेले असल्याने एकूण १४१ अर्ज डीसीसी निवडणुकीसाठी पात्र आहेत.
राष्ट्रवादीचा ‘मॅनेज’ गेम
डीसीसी निवडणुकीसाठी राकाँचे उमेदवार फार उत्साही नाहीत. परंतु ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यांचे अर्ज मागे घेण्यात येत आहेत. शेअरिंग करून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला एका अर्थी पाठबळ देत आहे काय ? असा संशय या निमित्ताने बळावला आहे.
अर्जून सपंतराव बडे (कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था), अंगद सखाराम मुंडे, तुळसाबाई रामदास खाडे, दिलीप भानुदासराव करपे, लक्ष्मण महादू लटपटे, (इतर शेती संस्था), शितल दिनकरराव कदम, शोभा वसंतराव साबळे, उषा महादेव तोंडे, सत्यभामा रामकृष्ण बांगर, पार्वती बाबासाहेब तपसे, सारिका रमेश पोकळे (महिला प्रतिनिधी), धनराज राजाभाऊ मुंडे, नितीन जीवराव ढाकणे (विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग), गणेश शिवदास पोकळे, संजय भिमराव सानप, निळकंठ भगवान भोसले, विश्वांभबर जनार्दनराव थावरे, मनोज बद्रीनाथ साबळे, व्यंकट माधवराव कराड, वसंतराव आप्पासाहेब आगळे, अविनाश बन्सीधर लोमटे (प्राथमिक, कृषी, पतपुरवठा, धान्य अधिकोष सहकारी संस्था)